आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमीधारी शेतकऱ्यालाही सहज विकता येईल जमीन, किचकट प्रक्रियेतून सुटका, राज्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भातील भूमीधारी म्हणजे भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना आता कोणतीही किचकट प्रक्रिया न करता स्वत: ची जमिन विकता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयामुळे विदर्भातील लाखाे शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. 


उशिरा, पण शहाणपणाचा निर्णय 
सरकारचा हा अतिशय चांगला निर्णय आहे. हे फार आधीच करायला हवे होते. पण उशिरा का होईना, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा शहाणपणाचा निर्णय घेतला. आणि असे राजकारण करण्याचा अधिकार सर्व राजकीय पक्षांना आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. 
- विजय जावंधीया, शेतकरी नेते 

बातम्या आणखी आहेत...