आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याशी शेतकऱ्यांची झुंज; बिबट्या ठार, दोघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात लोहारा येथे बिबट्याने दोन शेतकऱ्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनी चा जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी शर्थीची झुंज दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले तर बिबट्या ठार झाला.

 

वन्य प्राणी शेतातील पीक नष्ट करत असल्याने रवींद्र ठाकरे आणि राजेंद्र ठाकरे हे दोघे चुलत भाऊ शेतात पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्री जागले होते. सकाळी शेतातून परत येतांना बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. अचानक झालेला हल्ला परतवून लावताना दोघांनी कुऱ्हाडीने अर्धा तास बिबट्यासोबत झुंज दिली आणि बिबट्याला ठार केले. दोन्ही शेतकरी गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लोहारा हे गाव उमरेडमधील कऱ्हांडला अभयारण्याजवळ आहे. वन्य प्राण्यांचा या भागात त्रास असल्याचे या भागातील लोकांनी अनेकदा वनविभागाला कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...