आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला जंगलात नेवून दोघांनी केला सामूहिक अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- दोन महिन्यापूर्वी एका १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर पुन्हा तसाच प्रयत्न करण्यात आला. ही घटना तालुक्यातील खरूला येथे शनिवारी घडली. याप्रकरणातील दोघांना मध्यरात्रीच एसडीपीओ पथकाने ताब्यात घेतले. करण बसेरीया वय २१ वर्ष रा. खरूला ता. जि. यवतमाळ असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 


गेल्या दोन महिन्यापूर्वी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत खरूला या गावात एका १५ वर्षीय मुलीवर गावातील दोघांनी जंगलात नेवून जबरीने सामूहिक अत्याचार केला होता. तसेच कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामूळे भितीपोटी पिडीत मुलीने या बाबत कुणालाही सांगितले नव्हते. त्यानंतर शनिवार, दि. १६ जुन रोजी पिडीत मुलगी दुकानात जात असतांना गावातील करण बसेरीया आणि एका अल्पवयीन मुलाने तीला वाटेत अडवून पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर मुलीने त्यांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून आपल्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर घडलेला प्रकार आणि दोन महिन्यापूर्वी घडलेली घटना तीने कुटुंबीयांना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून कुटूंबीयांनी तातडीने यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांविरूध्द बाललैगींक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. दरम्यान मध्यरात्रीच उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप यांनी आपल्या पथकासह खरूला या गावी जावून त्या दोघांना ताब्यात घेवून ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर रविवार, दि. १७ जुन रोजी करण बसेरीया याला ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. १९ जूनपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर यामधील अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक पवन राठोड करीत आहे. 

बातम्या आणखी आहेत...