आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजन, पालकांचा आदर हीच यशाची शिदोरी; महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गुरू-शिष्य परंपरेचे आपण पुरस्कर्ते असून कुस्तीसारख्या खेळात गुरूंशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळेच जो मल्ल गुरुजनांसह पालकांचा आदर करतो त्यालाच कुस्तीत यश मिळते, असे मत राष्ट्रीय कुस्ती दंगलीच्या निमित्ताने अमरावतीत पहिल्यांदाच आलेला २१ वर्षीय महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेने व्यक्त केले. 

 
खट्याळपणा खेळाडूला शोभून दिसतो, पण ताे खेळात. कुस्तीपटूने प्रत्यक्ष जीवनात सावध राहण्याचा, शिस्तीने वागण्याचा सराव करायला हवा. हे गुणच पहिलवानाला फार वर नेत असतात. राज्यात कुस्तीची फार मोठी परंपरा आहे. त्यातही कुस्तीप्रेमी पालकांचे आपल्या मुलाने महाराष्ट्र केसरी बनावे असे स्वप्न असते. केसरी पदाला आपल्या  राज्यात फार महत्त्व आहे. त्यापुढे आंतरराष्ट्रीय पदकाचीही फारशी किंमत नसते. माझ्या वडिलांचेही मी महाराष्ट्र केसरी बनवे असे स्वप्न होते. यंदा मी ते पूर्ण केले. गतवर्षी मला विजय चौधरीविरुद्ध महाराष्ट्र केसरी पदाच्या अंतिम लढतीत अपयश आले होते. याआधी आंतरराष्ट्रीय कुस्तीतही मी देेशाचे प्रतिनिधित्व केले आहे. फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी उत्तम कामगिरी केली, मात्र मला पदक मिळाले नाही, असेही पहिलवानाने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.    


दिवसात तीन वेळा सराव
अभिजित कटके हा माझा शिष्य फारच हरहुन्नरी आणि मेहनती आहे. दिवसातून तीन वेळा तो सराव करतो. त्याचे जीवनच कुस्ती आहे. तो सदान््कदा कुस्तीबाबत विचार करीत असतो. बालपणापासूनच मजबूत शरीराचा असल्याने त्याला कुस्तीपटू बनवण्याचे त्याचे वडील तात्या कटके यांनी स्वप्न बघितले व ते पूर्णही झाले. आता यापुढे ताे आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती काेच भरत म्हस्के यांनी व्यक्त केले.    

 

महाराष्ट्र केसरीचे प्रथमच अंबानगरीत आगमन
राज्यातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर आजवर कोणत्याही पहिलवानाने अंबानगरीत पाय ठेवले नव्हते. परंतु, यंदा प्रथमच कुस्त्यांच्या राष्ट्रीय दंगलीच्या निमित्ताने अभिजित कटके अमरावती व बडनेऱ्यात आला. यासाठी राज्य पोलिस कुस्ती संघाचे प्रशिक्षक रणवीरसिंग राहल यांचे परिश्रमही यासाठी कारणीभूत ठरले. त्यांच्या आग्रहाखातर कटकेने अमरावतीत येण्याचे निमंत्रण स्वीकारले.

बातम्या आणखी आहेत...