आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक यापुढे नाही; साहित्य महामंडळच निवडणार संमेलनाचे अध्यक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी साहित्य महामंडळातर्फे घेतली जाणारी निवडणूक अाता हाेणार नाही. महामंडळच संमेलनाध्यक्षांची निवड करेल. ३० जून रोजी िवदर्भ साहित्य संघात झालेल्या विशेष सभेत घटनादुरुस्ती करुन या निर्णयावर शिक्कामाेर्तब करण्यात अाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ साहित्यिकांकडून हाेणाऱ्या सन्मानपूर्वक अध्यक्ष निवडीची मागणी पूर्ण झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 


नव्या पद्धतीने अध्यक्ष निवडीसाठी प्रत्येक घटक संस्था तीन नावे, तर संलग्न, समाविष्ट व सहयोगी संस्थांनी प्रत्येकी एक नाव सुचवायचे अाहे. तसेच तत्कालिन संमेलनाध्यक्षांनी आणि संमेलन निमंत्रक संस्थेने एक नाव सुचवायचे आहे. या नावांमधून एकाची निवड महामंडळ करील. 

बातम्या आणखी आहेत...