आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन वर्षे उलटूनही रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा नाही : रामदास आठवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘रिपब्लिकन पक्षाला सत्तेत दहा टक्के वाटा मिळेल, असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, सत्तेत येऊन ४ वर्षांचा कालावधी उलटूनही रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सामावून घेण्याचे प्रयत्न झाले नाहीत,’ या शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.   


खोरिपचे नेते उमाकांत रामटेके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आठवले मंगळवारी सकाळी नागपुरात आले होते. याप्रसंगी आठवले यांनी भाजपला आश्वासनाची आठवण करून दिली. ‘२०१४ च्या निवडणुकीत भीमशक्ती भाजपच्या पाठीशी राहिली. त्याचा परिणाम म्हणून भाजपला मोठा विजय मिळाला होता. केंद्रात भाजप-शिवसेनेसोबत आघाडी करतानाच भाजपने सत्तेत दहा टक्के  वाटा देण्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाला दिले होते. केंद्र व राज्यातील सत्तेला चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला तरी भाजपकडून आश्वासनाची पूर्ती झाली नाही. रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याचे कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत, याचे शल्य आजही मनात आहे. विधान परिषद, मंडळे, महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न व्हायला हवे होते. आम्ही भाजप नेत्यांच्या संपर्कात आहोत. येत्या काळात काही सकारात्मक होईल,’ अशी आशाही आठवलेंनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...