आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
घटनेच्या वेळी अंजनगाव सुर्जी ते वर्धा बस (एमएच ४०/ वाय ५९४९) ही परतवाड्याकडे जात होती. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव येणारी इंडिका कार (एमएच २७/ एसी १५०५) एसटीवर धडकली. त्यामुळे एसटीचा समोरील भाग पूर्णत: निकामी झाला, तर कारही क्षतिग्रस्त झाली. अपघातानंतर क्षतिग्रस्त कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या संत्रा बागेच्या शेतात काटेरी झुडपात अडकली. कारमधील जखमी रोशन सुभाषराव भाकरे, गुणवंत भास्कर पवार व संदीप राजेश नानगे हे परतवाडा येथून काम आटोपून निमखेड बाजार येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.