आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०० रुपयांची लाच घेताना जामनीच्या तलाठ्यास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- शेतकऱ्याला सात बारा देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना जामनी येथील तलाठी विनोद रघुनाथ खेकडे याला एसीबी वर्धा दलाने अटक केली. शेतकऱ्याला शेती कामासाठी सात बारा पाहिजे होता, परंतु तलाठी खेकडे त्याला सात बारा देत नव्हता. सात बारा हवा असेल तर ५०० रुपये द्यावे लागतील असे तलाठ्याने शेतकऱ्याला सांगितले. 


शेतकऱ्याने बाबत वर्धा एसीबी दलाकडे तक्रार केली त्यावरुन एसीबी दलाने सापळा रचून हिंगणघाट येथील प्रशासकीय भवनाजवळ ५०० रुपयांची लाच घेताना तलाठी खेकडे याला अटक केली. ही कार्यवाही आज, १५ जून ११:३० वाजताच्या सुमारास उपअधीक्षक बाळासाहेब गावंडे, पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, अतुल वैध, श्रीधर उईके, सागर भोसले, रोशन निंबाळकर यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...