आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात आली 'चाय बाइक', गर्दीच्या ठिकाणी चहा तुमच्याकडे चालून येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अनेक गोरगरीब महिला फुटपाथवर वा जागा मिळेल तिथे चहाची टपरी लावतात. मात्र अतिक्रमण विभागाच्या कारवाईत त्या हटवल्या जातात. यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून नागपूर महापालिकेने चाय बाइकचा उपक्रम राबवला आहे. 


१ चाय बाइकसाठी महिला बचत गटांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे. त्यातून लकी ड्रॉद्वारे एकाची ३ वर्षांसाठी निवड होईल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढे आणखी चाय बाइकची संख्या वाढवली जाईल. 
२ असा उपक्रम राबवणारी नागपूर महापालिका राज्य आणि देशातील पहिलीच असल्याचा दावा मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी केला आहे. 


बाइक अशी 
ही तीनचाकी सायकल रिक्षा तयार करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येणार आहे. सर्व गर्दीच्या ठिकाणी चाय बाइक फिरणार आहे. ११ महिन्यांच्या करारावर चाय बाइक बचत गटाला देण्यात येईल. बाइकमध्ये इतर खाद्य पदार्थही ठेवता येतील. 

बातम्या आणखी आहेत...