आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधक- सत्ताधाऱ्यांत आजपासून गडगडाट; विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन प्रथमच नागपुरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यंदा प्रथमच नागपुरात हाेत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बुधवारपासून प्रारंभ हाेत अाहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर अाराेपांच्या फैरी झाडत पुढील काळात हाेणाऱ्या सामन्याचे जणू ट्रेलरच दाखवून दिले अाहे. फडणवीस सरकारवर अपयशी कामगिरीचा अाराेप करत विराेधी पक्षांनी अापल्या पत्रकार परिषदेच्या वेळी व्यंगचित्रांमधून सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कार्यपद्धतीवर टाेलेबाजी केली. दरम्यान, स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या विदर्भवाद्यांनी पहिल्याच दिवशी नागपूर बंदची घोषणा केली आहे. 


१७६७ काेटींच्या कथित घाेटाळ्यावरून खडाजंगी 
धनंजय मुंडे :
सिडकोतील जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय जमिनीचे व्यवहार होऊ शकत नाहीत. याची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व धनंजय मुंडेंनी केली. या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 


मुख्यमंत्री : 'विरोधक अफवा पसरवत आहेत. पुरावे नसल्याने जुनी कागदपत्रे दाखवून घाेटाळ्याचा अाराेप करत अाहेत. मात्र १,७६७ कोटींच्या कथित भूखंड घाेटाळाप्रकरणी अापण पाहिजे त्या चौकशीला तयार आहोत. मुळात ही जमीन सिडकाेची नसून राज्य सरकारचीच अाहे,' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. 

 

अामदार निवासात मृतदेह
अामदार निवासात मुंबईचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या खाेलीत विनाेद अग्रवाल (५८) यांचा मृतदेह सापडला. ते लटके यांचे 'पीए' संदीप बरकडे यांचे मदतनीस होते. 

 

बातम्या आणखी आहेत...