आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : विधान भवनात आता आमदारांसाठी 'वाॅटरप्रूफ रेड कार्पेट'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपुरात गेल्या ५ तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे विधान भवनाच्या मागील भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी शिरले होते. विधानभवन परिसरात तर तळेच साचले होते. परत मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस कोंडी होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. 


विरोधी पक्षांनी या घटनेचे भांडवल करीत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सभागृहात येण्यासाठी आधी नुसता लाल गालिचा अंथरण्यात आला होता. आता त्याऐवजी वॉटरप्रूफ लाल कार्पेट बसवण्यात आले आहे. याशिवाय तळघरातील वीज पुरवठा केंद्रात पुन्हा पावसाचे पाणी शिरू नये म्हणून तेथे आता २ फुटांची सुरक्षा भिंत उभारण्यात येऊन सिमेंटची पायरी बांधण्यात आली आहे. पावसाचे पाणी न साचता वेगाने वाहून जाण्यासाठी विधानभवन परिसरातील सर्व गटारांची युद्धपातळीवर सफाई करण्यात येत आहे. पावसाचे पाणी विधानभवन परिसरात जमा होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.


पूरग्रस्तांना नुकसान भरपाई : मुख्यमंत्री 
गेल्या आठवड्यात नागपूर शहरात झालेल्या तुफानी पावसामुळे नुकसान झालेल्यांना संपूर्ण भरपाई देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने केलेल्या कामाचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले. मात्र या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागांसोबतच विधानभवनातील भागातही पाणी साचले होते. शिवाय, वीजही गुल झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...