आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक लोकांना लाभ देण्यासाठी जीवनदायी योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणार: मुख्यमंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेचाही लाभ राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करू. शिवाय, मागास जिल्ह्यात या योजनेच्या नियमांतही शिथिलता आणण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले. या योजनेचे स्वरूप सर्वव्यापी नसल्याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते. 


आघाडी सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या राजीव गांधी योजनेचा प्रत्यक्ष लाभ आतापर्यंत अवघ्या अर्धा टक्का नागरिकांना मिळाला असल्याचा दावा या तारांकित प्रश्नाद्वारे करण्यात आला होता. याचा लाभ नागरिकांऐवजी विमा कंपन्यांनाच होत असल्याचा आक्षेप कॅगने घेतला होता. पआरोग्य शिबिरे व अारोग्यमित्रांची नियुक्ती न केल्याने योजनेची योग्य प्रमाणात अंमलबजावणी होत नसल्याकडेही या वेळी लक्ष वेधले. आरोग्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, आतापर्यंत दोन कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाला असून योजनेच्या नव्या निविदा प्रक्रियेदरम्यान रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याशिवाय मागास जिल्ह्यांमध्ये या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही नियम शिथिल करण्यात आले अाहेत. 


अारोग्यमंत्री गैरहजर राहणार 
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या विधान परिषदेतील आमदारकीची मुदत संपली असल्याने नाराज सावंत अधिवेशनातील पुढील दोन आठवडे गैरहजर राहणार असल्याची बाब त्यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी केला. तसेच आरोग्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काही पर्यायी व्यवस्था सरकारने केली आहे का, असा सवाल करत त्यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. 

बातम्या आणखी आहेत...