आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्तांसाठी चिमुकलीने मुख्यमंत्री फडणविसांकडे दिली पिग्गी बँक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री भारावले : राशिकाच्या औदार्याचे मुख्यमंत्र्यांना कौतुक वाटले. यातून प्रेरणा घेतली जाईल, असे मत त्यांनी मांडले. - Divya Marathi
मुख्यमंत्री भारावले : राशिकाच्या औदार्याचे मुख्यमंत्र्यांना कौतुक वाटले. यातून प्रेरणा घेतली जाईल, असे मत त्यांनी मांडले.
नागपूर - दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता आमिर खानने मुख्यमंत्र्यांकडे धनादेश दिल्याच्या घटनेतून प्रेरणा घेत नागपुरातील राशिका मनोज जोशी या आठवर्षीय चिमुकलीने रविवारी नागपुरात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जमवलेल्या पैशाची पिगी बँक सुपूर्द केली. यामुळे मुख्यमंत्रीही भारावून गेले. भारतीय विद्या भवनमध्ये चौथीत शिकणारी राशिका छत्रपतीनगरात राहते. तिचे वडील नागपूर पालिकेत कार्यरत आहेत. चिमुकली राशिका आमिर खानचीही चाहती आहे.

आमिर खानचे पाहून राशिकाने आपल्या पिगी बँकेमध्ये पैसे जमवले. शनिवारी येथे आलेल्या मुख्यमंत्रयांना पिगी बँक देण्यासाठी तिने वडिलांकडे आग्रह धरला. रविवारी सकाळी वडिलांचे मित्र अभय देशमुख तिला घेऊन रामगिरी बंगल्यावर गेले होते.