आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूसही घसरला, भाव 5,660 रुपयांवर; भावातील घसरणीमुळे बाजारातील आवक घटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जानेवारीमध्ये सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटलवर गेलेले कापसाचे दर देशातंर्गत असलेल्या प्रमुख बाजारपेठेत आवक वाढल्याने सध्या सरासरी ५६०० रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे येथील खासगी बाजारात बुधवारी (दि. १) कापसाला कमाल ५६६० तर किमान ५६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळला. दरम्यान, ही मंदी अल्पावधीसाठीच राहणार असल्याची चर्चा सध्या वायदे बाजारात दिसून येत आहे. 

देशांतर्गंत विक्रमी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, कॉटन असोिशएन ऑफ इंडियाच्यावतीने (सीएआय) देशात ३४६ लाख कापूस गाठींचे उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, सीएआयच्या नवीन अंदाजानुसार ३४१ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वधारल्याने जिल्ह्यातही कापसाचे दर सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेले होते. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गंत असलेल्या कापूस उद्योगांकडूनही कापसाच्या भाववाढीच्या शक्यतेने मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करण्यात आली. दरम्यान, सध्या देशांतर्गंत असलेल्या बाजारपेठेत कापसाची आवक वाढल्याने दरात किरकोळ घसरण झाली आहे. याचा परिणाम येथील बाजारपेठेवरही पडला आहे. 

अमरावतीत झाली विक्रमी कापूस खरेदी 
जिल्ह्यात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाऱ्यांकडून २१ नोव्हेंबरपासून आजपर्यंत विक्रमी लाख ६० हजार ८४० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यात यावर्षी कापसाचे समाधानकारक उत्पादन झाले आहे. सध्या मिळणारा भाव अल्प असल्याने शेतकऱ्यांनी अद्याप मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक केली आहे. 

उडीद,मूग,भूईमूग सोयाबीनच्या दरात मोठी घसरण 
जिल्ह्यातीलप्रमुख पीके असलेल्या उडीद, मूग, सोयाबीनच्या दराबाबत सुरवातीपासून साडेसाती सुरू असून, बुधवार (दि. १) या प्रमुख पीकांच्या दरात कमालीची घसरण झाली. त्याचप्रमाणे भुईमुगाच्या दरातही आज विक्रमी घसरण झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीन ही प्रमुख पिके असून, बागायत पट्ट्यात भुईमुगाचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरम्यान, यावर्षी समाधानकारक पावसामुळे उडीद, मूग सोयाबीनचे जिल्ह्यात समाधानकारक उत्पादन झाले. परंतु ऐन हंगामात तिनही प्रमुख शेतमाल मातीमोल दराने बाजारात विकला गेला. मागील वर्षी सोयाबीन वगळता उडीद, मुगाचे दर सातत्याने सरासरी ते १० हजार रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. परंतु हंगामापासून सुरू झालेली घसरण डिसेंबर, जानेवारी मध्ये काहीसी सावरल्याचे चित्र असतानाच मुगाला कमाल ४६०० तर किमान ४०००, उडीद कमाल ५५५० तर किमान ४२०० तर सोयाबीनला कमाल २६७५ तर किमान २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भुईमुगाच्या दरातही घसरण झाली. 
बातम्या आणखी आहेत...