आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील आदिवासी बांधवांना मदतीचा हात, जय जवान जय किसान ग्रुपचा उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुकरण करत तालुक्यातील जय जवान जय किसान ग्रुपने मेळघाटातील आदिवासींच्या चेहऱ्यांवर आनंद झळकावा त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांना अमरावती येथील वंदे मातरम् ग्रुपचेही सहकार्य लाभले आहे. 
 
जय जवान जय किसान ग्रुपने कपडे, फराळ, पुस्तकांचा चक्क जोगवा मागितला. प्रत्येक घटकाने उपक्रमाला प्रतिसाद दिला. नागरिकांनी टाकाऊ कपडे, उबदार कपडे, ब्लँकेट, स्वेटर, शाल, साड्या, लहान मुलांचे कपडे, खेळणी आदींचे दान करत जय जवान वंदे मातरम् ग्रुपपर्यंत पेाहोचवले. ग्रुपचे वैभव देशमुख, कुंदन ठाकूर, शुभम किनाके, अतुल भोगे, अंकित ठाकरे अन्य सदस्यांनी समाजातून मिळालेली ही मदत मेळघाटातील आदिवासींपर्यंत पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यांवर समाधान फुलवण्यासाठी खारीचा वाटा उचलला. परिस्थितीअभावी अनेकांना सणांपासून वंचित राहण्याची वेळ येते. अशा वेळी सुख वाटताना दुःख आपोआप कमी होत सामाजिक दायित्वाचे भान कायम राहत माणुसकीच्या भिंती आपोआप निर्माण होत असल्याचे मत वैभव देशमुख, कमल छांगाणी, अॅड. योगेश पवार यांनी व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...