आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्वी येथे चोर समजून दोघांना बदडले; ग्रामस्थांचा खडा पहारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - चोरट्यांच्या दहशतीमुळे तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये ग्रामस्थांनी खडा पहारा सुरू केला आहे. दरम्यान, जळगाव आर्वी येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोघांना चोर समजून ग्रामस्थांनी बदडल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी एका संशयित व्यक्तीलाही वाढोणा येथील गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान, तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये चोरट्यांची कमालीची दहशत पसरल्याचे चित्र निर्माण झाले. 
 
तालुक्यात महिनाभरापूर्वी गुंजी, ढाकुलगाव, गव्हा (फरकाळे), अशोकनगर, अंजणसिंगी, अंजनवती, कावली (वासाड), जळका (जगताप) आदी गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यावेळेस गावकऱ्यांनी अनेकदा या चोरांना पळवून लावल्याचा घटना घडल्या आहेत. दरम्यान, अशाच स्वरूपाच्या घटनांची पुनरावृत्ती वाढोणा, तळेगाव दशासर, घुसळी, आसेगाव, महिमपूर, शेंदुर्जना या गावांमध्ये होत असल्याचे चित्र आहे. गावकरी रात्रभर लाठ्या-काठ्या घेऊन गावात रक्षण करत आहेत. दरम्यान, वाढोणा येथे शुक्रवारी सायंकाळी एका संशयिताला पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले, तर शनिवारी सायंकाळी दोघांना संशयास्पद स्थितीत फिरताना जळगाव आर्वीवासीयांनी पकडले. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या परिसरात तांडा वस्तीत संबंधित दोघे फिरत असताना वस्तीतील लोकांनी त्यांना पकडून मारहाण केली दत्तापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ते चोर आहे किंवा नाही हे स्पष्ट झाले नाही. ढाकुलगाव येथील सरपंच विजय कांडलकर म्हणाले, महिनाभरापूर्वी ढाकुलगावासोबतच परिसरातील गव्हा (फरकडे), गव्हाणी पानी, अशोकनगर, अंजणसिंगी, अंजनवती, कावली या गावात चोरांची भीती पसरली होती. रात्रीला कुऱ्हा पोलिसांनी गस्त घातल्याने गावकऱ्यांनी त्यांना पळून लावल्याने सध्या चोरट्यांना आळा बसला आहे. 
 
अफवा पसरवू नका 
(दत्तापूर)धामणगावरेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अशा गावांमध्ये मी स्वतः जाऊन भेट दिली आहे. त्यात आशेगावला शिपाई ठेऊन सावळा या गावतही जाऊन आलो. परंतु असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे सतर्क राहावे. अफवा पसरवू नये, कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना द्यावी. 
- अशोक लांडे, ठाणेदार, दत्तापूर (धा.रे.) 
 
बातम्या आणखी आहेत...