आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विम्याच्या मुद्द्यावर अब्‍दुल सत्तार यांचा सभात्याग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पीक विम्याच्या प्रश्नावर अापल्याला बाेलू दिले जात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापासून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा अाराेप करत संतप्त झालेले काँग्रेस अामदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेतून सभात्याग केला. तत्पूर्वी तालिका अध्यक्षांशी त्यांची शाब्दिक बाचाबाचीही झाली.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अामदार सत्तार यांनी पहिल्या दिवशीपासूनच सरकारविराेधात अाक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून अाले. मराठा- मुस्लिम अारक्षण, मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी असाे की मलकापूर दंगलीतील अाराेपींना कठाेर शासन करण्याबाबत पाठपुरावा असाे, या प्रत्येकच मागणीवर अामदार सत्तार गेल्या अाठवड्यापासून सभागृहात अाक्रमक भूमिका घेताना दिसले. बुधवारी सकाळपासून विराेधकांनी याच मुद्द्यावर सभागृहात गाेंधळ घालून तीन वेळा कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले, त्यातही सत्तार अाघाडीवर हाेते. दुपारनंतर विराेधी बाकावरील बहुतांश सदस्य माेर्चात सहभागी हाेण्यासाठी गेले हाेते. माेर्चाहून परत अाल्यानंतर सत्तार यांना थेट विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या शेजारी बसण्याची संधीही मिळाली.

पंतप्रधान पीक विमा याेजनेत शेतकऱ्यांची लूट हाेत असल्याची लक्षवेधी विखे पाटील यांनी उपस्थित केली हाेती. त्यात शशिकांत शिंदे, जयंत पाटील या ज्येष्ठ सदस्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. अामदार अब्दुल सत्तार यांचेही या लक्षवेधीच्या सूचनेत नाव हाेते. त्यामुळे या विषयावर बाेलण्यासाठी ते वारंवार हात वर करत हाेते, उभे राहून बाेलण्याची संधी मागत हाेते.

मात्र, पीक विम्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष व विराेधकांमध्ये चांगलीच जुंपल्यामुळे सत्तार यांना बाेलण्याची संधी मिळत नव्हती. या प्रकारामुळे भडकलेल्या सत्तार यांनी तालिका अध्यक्ष याेगेश सागर यांच्यावर संताप व्यक्त केला. ‘मला चर्चेतून हेतुपुरस्सरपणे डावलले जात अाहे,’ अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला. त्यावर ‘अशा भाषेत तालिका अध्यक्षांशी बाेलू नका,’ अशी समज सागर यांनी त्यांना दिली. मात्र, सत्तार काही शांत हाेत नव्हते. त्यावर सागर यांनी विखे पाटील यांनाही ‘तुमच्या सदस्याला शांत करा’ अशा सूचना दिल्या. त्यामुळे अधिकच भडकलेल्या सत्तार यांनी सभात्याग करत
बाहेरचा रस्ता धरला.
बातम्या आणखी आहेत...