आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजितने एका हाताने पेलले गरिबी अन् साॅफ्टबाॅलचे अाव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खेळाबद्दल निष्ठा, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द असेल, तर आकाशही ठेंगणे ठरते. याचा प्रत्यय एका हाताने अपंग असताना एका हाताने साॅफ्टबाॅल खेळणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित फिरकेची अप्रतिम कामगिरी बघून येतो. घरची गरीब परिस्थिती अन् एक हात अपंग असतानाही या खेळाडूने परिश्रम घेतले, तर अशक्य काहीच नाही, अशी प्रेरणा दिली आहे.

२०१२ मध्ये अभिजितने वडिलांचा आधार गमावला. त्यानंतर क्षयरोग हृदयाच्या आजाराने ग्रस्त आईला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आली, तिची सेवा करून स्वत:चा खेळ सुरू ठेवला. उपजीविकेसाठी त्याने मुलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यावरच त्याची उपजीविका चालते. तो एमपीएड प्रथम वर्षाला यवतमाळ येथे शिकत आहे. सुरुवातीला तो कबड्डी खेळायचा. मात्र, साॅफ्टबाॅल अभिजितला शाळेत असताना आवडला. प्रारंभी तो हातात ग्लोव्हज घालता तसाच चेंडू झेलायचा. याचे वैशिष्ट्य असे की, तो एकाच हाताने कॅचिंग बाॅलिंग करतो. चेंडू गोलंदाजी केली की, खाली वाकून हातात ग्लोव्हज चढवून तो झेलतो. यामुळेच तो कोणत्याही स्पर्धेत सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्याचा खेळही बहारदार आहे. गुणी खेळाडू असल्यामुळे त्याला साॅफ्टबाॅल संघटनेचे पदाधिकारी सर्वतोपरी मदत करतात.

हाॅलीवूडमध्ये पाठवणार कथानक
बेसबाॅलवर आधारित मिलियन डाॅलर्स या चित्रपटाची िनर्मिती हाॅलीवूडमध्ये झाली. ते बघून जिल्हा राज्य साॅफ्टबाॅल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित फिरकेचे कथानक दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गसह अभिनेत राज बब्बर यांना पाठवण्याचा िनर्णय घेतल्याची माहिती डाॅ. येवतीकर यांनी दिली.
विद्यापीठाला दिले पहिले सुवर्ण
अभिजितने एका हाताच्या बळावर गुंटूरला झालेल्या अ. भा. विद्यापीठ साॅफ्टबाॅल स्पर्धेत विद्यापीठाच्या इतिहासात पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. सॉफ्टबाॅलमध्ये राज्यातील विद्यापीठाने या खेळात मिळवलेले हे पहिलेच सुवर्ण पदक ठरले. तसेच अभिजितने सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारही पटकावला आहे.