आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- विविधगंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शहर डिबी पथकाने नागपूर येथून २६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. मंगेश उर्फ विक्की विठ्ठल कन्नाके वय ३० वर्ष रा. बांगर नगर असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका खून प्रकरणात विक्की कन्नाके हा सन २०१४ पासून फरार होता. यासह आणखी शहर पोलिस स्टेशन आणि वडगावरोड पोलिस ठाण्यात विक्की कन्नाके यांच्या विरूध्द गुन्हे दाखल होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला केला होता. मात्र, तो दोन वर्षापासून फरार होता. दरम्यान शहर पोलिस ठाण्यात डिबी पथकाचे प्रमुख मंगेश भोयर यांना विक्की कन्नाके याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून शहर डिबी पथकाने नागपूर गाठून त्याला अटक केली. शनिवार, दि. २७ रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...