आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अल्पवयीन युवतींवर चाकूच्या धाकावर अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदूररेल्वे तालुक्यात मामाकडे शिकण्यासाठी असलेल्या एका १५ वर्षीय युवतीवर गावातील १६ वर्षीय युवकाने थेट चाकूने वार करून अत्याचार केला इतकेच नाही तर त्याने व्हीडीओ चित्रण सुद्धा केले होते. या प्रकरणाची वाच्यता केल्यास याच व्हीडीओद्वारे बदनामी करेल, अशी धमकी दिल्यामुळे युवतीने आतापर्यंत ही बाब कोणालाही सांगितली नव्हती, मात्र हे प्रकरण पुढे येताच पिडीत युवतींच्या नातेवाईकांनी गाडगेनगर पोलिसात शुक्रवारी सप्टेंबरला रात्री तक्रार दिली तसेच अन्य एका घटनेत शहरातील फ्रेजरपुराहद्दीत राहणाऱ्या एका युवकाने चाकूचा धाक दाखवून १७ वर्षीय युवतीवर अत्याचार केला आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती, या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी १० सप्टेंबरला पहाटे गुन्हा दाखल केला. या दोन्ही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा महिला, युवतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात असलेल्या एका गावात मामाकडे एक १५ वर्षीय मुलगी मागील अनेक वर्षांपासून शिकण्यासाठी राहते. दरम्यान मामाच्या घराशेजारीच राहणारा मुलीच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका १६ वर्षीय युवकाने या मुलीला दिड महिन्यांपूर्वी गावातीलच रस्त्यात अडवले. या दोघांमध्ये वाद झाला, त्यावेळी मुलाने या मुलीला मारहाण केली. झालेल्या प्रकाराबाबत मुलीने कोणालाही सांगितले नाही, मात्र ती दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेली. मला का मारले? यासंदर्भात तिने मुलाला जाब विचारला. त्यावेळी त्याने मुलीला जबरीने घरात घेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र ही मुलगी त्याला प्रतिकार करत होती. त्यामुळे त्याने मुलीच्या अंगावर चाकूने वार केला, त्यानंतर घरातच त्याने बलात्कार केला. इतकेच नाही तर बलात्काराचे व्हीडीओ शुटींग काढले. या प्रकारामुळे धास्तावलेली पिडीत युवती घरी गेली. दरम्यान त्याच व्हीडीओशुटींगच्या आधारे त्या युवकाने युवतीवर तीन वेळा बलात्कार केला. मात्र जीवे मारण्याची धमकी आणि काढलेल्या व्हीडीओ शुटींगमुळे ही युवती झालेल्या घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता करत नव्हती. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या पिडीत मुलीला उपचारासाठी शहरातील एका रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिने हा घटनाक्रम तिच्या नातेवाईकांना सांगितला. हा धक्कादायक घटनाक्रम ऐकून नातेवाईकांच्याही पायाखालची वाळू सरकली. ही घटना ही चांदूर रेल्वे तालुक्यात घडली. मात्र पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सप्टेंबरला रात्री गाडगेनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध बलात्कार, मारहाण, जीवे मारण्याची धमकी, बाल लैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करून हे प्रकरण चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास चांदूर रेल्वे पोलिसांनी सुरू केला असून, त्या युवकाला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. दुसऱ्या घटनेत फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवतीवर परिसरातील युवकाने चाकूचा धाक दाखवून मागील तीन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामुळे अल्पवयीन युवतीला गर्भधारणा झाली. ही बाब मुलीने भीतीपोटी सांगितली नाही, मात्र १० सप्टेंबरला रात्री मुलीने फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अमित ऊर्फ मोनू विश्वनाथ शर्मा (२५ रा. फ्रेजरपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या दाेन्ही घटनांमधील पीडित मुली अल्पवयीन असून, त्यांच्या शोषणासाठी त्यांना चाकूचा धाक दाखवला. चांदूर रेल्वेच्या घटनेत तर आरोपी अल्पवयीन आहे, त्याने हे कृत्य करण्यासाठी मुलीवर चाकूने वार केले.

‘त्या’ युवकाला घेतले ताब्यात
^शहरातील गाडगेनगरपोलिसांकडून आलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या युवकाला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त करून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण दीड महिन्यांपूर्वी घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. गिरीश बोबडे, ठाणेदार, चांदूर रेल्वे.

प्रकरण चांदूर रेल्वे पोलिसांकडे वर्ग
^या युवतीवर एका रुग्णालयात उपचार सुरू अाहे. ही घटना चांदूर रेल्वे ठाण्याच्या हद्दीतील असून, आम्ही गुन्हा दाखल करून प्रकरण चांदूर रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलिस करत आहे. कैलाशपुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर.

तक्रार प्राप्त होताच आरोपीला केली अटक
^युवतीच्या तक्रावरीवरून आम्ही शुक्रवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली आहे. प्रमेष आत्राम, ठाणेदार, फ्रेजरपुरा.
बातम्या आणखी आहेत...