आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशविरोधी घोषणांचा अभाविपकडून निषेध, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- दिल्ली येथे देश विरोधात घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आतंकवाद नक्षलवादी यांना समर्थन करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी आज दि. १८ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दत्त चौक परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आतंकवादी अफजल गुरू, याकूब मेमन यांना फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या स्मरणार्थ दि. फेब्रुवारी २०१६ रोजी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये त्यांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेथे देशविरोधी नारे घोषणा देण्यात आल्या. या आतंकवाद्यांना शहिदाचा दर्जा देण्यात आला. देशामध्ये घडलेल्या या कृत्यांमुळे जनमानसात संताप व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे या कृत्यांमध्ये सामील जेएनयूमधील सहभागी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी अभाविपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विक्रमजीत कलाने, हरिदास शेंडे, संकेत कोल्हे, आकाश खांदवे, कौस्तुभ मोहदरकर, पियुष पंचबुध्दे, रोहित राठोड, शुभम ठाकरे आदी उपस्थित होते.