आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीच्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू, भिवापूर जवळ अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आर्वी येथून याम्हा आरवन फाईव्ह या दुचाकीने अमरावतीकडे भरधाव येणाऱ्या दोन युवकांची दुचाकी अनियंत्रित झाली, या वेळी दोन्ही युवक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दगडावर जावून आदळले. यामध्ये दोन्ही युवकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी २५ एप्रिलला दुपारी वाजताच्या सुमारास कुऱ्हा ते मार्डी मार्गावरील भिवापूर गावाजवळच्या वळणावर झाला.

अमन राजेश टावरी (१९) आणि सत्यम सुधीर पुरोहीत (१९ रा. आर्वी) असे अपघातात मृत झालेल्या युवकांचे नाव आहे. अमन सत्यम हे एकमेकांचे मित्र असून, दोघेही आर्वीलाच पॉलिटेक्नीकला शिकत आहे. सोमवारी दुपारी अमरावतीला येण्यासाठी ते एका मित्राच्या यामाहा आरवन फाईव्हने (क्रमांक एम. एच. २७ बी. जे. १०४२) अमरावतीकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान कुऱ्हापासून काही अंतरावर आलेल्या भिवापूर गावाच्या वळणावर या युवकांची दुचाकी अनियंत्रित झाली दुचाकी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या वेळी अमन सत्यम हे दोघेही झाडावर तसेच खाली असलेल्या दगडावर आदळल्यामुळे दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रमस्थ पोलिस घटनास्थळी पोहोचले.

दोघेही एसटीमधून उतरले दुचाकीने निघाले
कडाक्याचे उन्ह असल्यामुळे अमन सत्यम यांना सत्यमच्या वडीलांनी आर्वीच्या बसस्थानकामधून अमरावतीकडे येणाऱ्या एसटीमध्ये बसवून दिले होते. मात्र आर्वीमधीलच जुना बस स्टॅन्डवर आल्यानंतर दोघेही एसटीमधून खाली उतरले. त्याच भागात असलेल्या एका मित्राची यामाहा आरवनफाईव्ह ही दुचाकी घेतली. या दुचाकीने भरधाव अमरावतीकडे येत असताना त्यांचा अपघात झाला दोघेही मृत्यूमुखी पडले. या युवकांच्या दुचाकींची गती अतिशय बेभान होती, त्यांनी अनेक वाहनांना ओव्हरटेक केले होते, असे कुऱ्हा पोलिसांनी सांगितले.