आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकी अपघातात १ ठार, पिता-पुत्र जखमी, बिझीलॅँडजवळ घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगावपेठ- नातेवाइकाच्या मुलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दुचाकीने अमरावती शहरात जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर पिता-पुत्र गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. ११) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान बिझीलँडजवळ घडली. सचिन जवंजाळ (३३ रा. कठोरा गांधी) असे मृतकाचे नाव आहे. समाधान वानखडे (४०),प्रथम वानखडे (१२) या जखमी पिता-पुत्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कठोरा गांधी येथील रहिवासी समाधान वानखडे हे मुलाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुलासह अमरावती येथे जात होते. त्या वेळी जवंजाळ हेदेखील त्यांच्यासाेबत होते. दरम्यान, बिझीलँडजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम एच ४०/ एन २६००) जबर धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्वरित त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान जवंजाळ यांची प्राणज्याेत मालवली. प्रथमची प्रकृती ठीक असून, समाधान वानखडे गंभीर आहेत. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर पळून जाणाऱ्या ट्रकला पकडण्यात नांदगाव पोलिसांना यश आले. मृतक सचिन जवंजाळ यांना दोन वर्षांचा मुलगा असून, अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...