आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी अपघातात मुलगा ठार, वडील गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव पेठ - अमरावती शहरातील कौटुंबिक कार्यक्रम आटोपून गावी परत जाताना दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना फतेपूर फाट्यावर गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. आशीष गणपत पाटमासे (२५ रा.राजुरवाडी) असे मृत मुलाचे नाव असून, वडील गणपत रामचंद्र पाटमासे (६०) यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने पाटमासे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृतक आशीष हा सोफिया कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. गुरुवारी आशीष त्याचे वडील गणपत रामचंद्र पाटमासे (६०) दोघेही कौटुंबिक कार्यक्रमासाठी सकाळी अमरावती येथे नातेवाईकांकडे आले होते. कार्यक्रम आटोपून सायंकाळी दुचाकीने (एमएच २७/बीजे ७२१३) राजुरवाडीला जात होते.दरम्यान,फत्तेपूर फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी बाजूच्या खड्ड्यात पडली. त्यात आशीष जागीच ठार झाला, तर पाटमासे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती नांदगावपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटमासे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे राजुरवाडीत शोककळा पसरली आहे.