आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने मजूर युवकास चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - जुळ्या शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या जीवावर उठली असून, शनिवार, एप्रिल रोजी सकाळी भरधाव ट्रकने एका मजूर युवकाचा बळी घेतला. मो. राजीक शे. मेहबूब (२५), असे मृतकाचे नाव अाहे.तो अचलपूर येथील मंजूरपुरा परिसरातील रहिवासी होता.
मृतक राजीक हा घराच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत होता. शनिवारी नेहमीप्रमाणे तो अचलपूर येथून परतवाडा येथे सायकलने कामावर जाण्यास निघाला. दरम्यान, जयस्तंभ चौकामध्ये एमएच ३० एल ०८२९ क्रमांकाच्या ट्रकने त्याला मागून धडक दिली. त्यामध्ये तो जखमी झाला. नागरिकांनी त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, वाटेतच त्याने शेवटचा श्वास घेतला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळची वेळ अन् अपघाताचा मेळ : जयस्तंभचौकातून मध्य प्रदेश, अकोला, मेळघाटकडे जाणाऱ्या बसेस जड वाहनासोबतच शाळकरी विद्यार्थी चाकरमान्यांसह मजुरांचीही गर्दी असते. या परिसरामध्ये किरकोळ अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. अशाप्रकारे झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. यापूर्वी मो. इकबाल, घामोडिया प्लॉट येथील मिश्रा यांची मुलगी, अचलपूरच्या दोन युवकांचा समावेश असून, अपघाताची या चौकातील ही चौथी घटना आहे. या सर्व घटना सकाळच्या वेळेत घडल्या आहेत.