आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळी परिसरात वृद्धेचा अपघाती मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडाळी परिसरातील पारधीपुरा येथील महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाला पांगवताना पोलिस पथक. - Divya Marathi
वडाळी परिसरातील पारधीपुरा येथील महिलेचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाला पांगवताना पोलिस पथक.
अमरावती- घरासमोरचा मुख्य रस्ता ओलांडताना वडाळी परिसरातील पारधीपुरा येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला शुक्रवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी व्हॅनचालक नरेंद्र नामदेवराव शितळेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी रात्रीच अटक केली. मात्र, याठिकाणी परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच गतीरोधक बसवण्याची मागणी केली होती.
मात्र, अजूनही गतीरोधक बसवण्यात आला नाही. गतिरोधक नसल्यामुळेच वृद्धेचा नाहक बळी गेला असा रोष व्यक्त करीत संतप्त महिला-पुरुषांनी शनिवारी (दि. ६) सकाळी वाजताच्या सुमारास टायर जाळून वडाळी परिसरातून जाणारा चांदूर रेल्वे रस्ता रोखला. यावेळी पोलिसांनी नागरिकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला असता नागरिक पोलिसांमध्ये धक्काबुकी झाली. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यानंतर क्युआरटी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.

इंदू भागचंद भोसले (६५, रा. पारधीपुरा, वडाळी, अमरावती) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. इंदू भोसले शुक्रवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास घरासमोर असलेला अमरावती ते चांदूररेल्वे हा मुख्य मार्ग आेलांडताना मारुती व्हॅनने (एम.एच. ३२ सी २०८ )त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी व्हॅनचालक नरेंद्र शितळेला शुक्रवारी रात्रीच अटक केली.

दरम्यान ,यापूर्वी अनेकदा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे या ठिकाणी गतीरोधक बसवण्याची मागणी केली होती. यापुर्वी सुद्धा याच ठिकाणी ते अपघात झाले .मात्र त्यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नव्हती. शनिवारी सकाळी वाजताच्या सुमारास परिसरातील शेकडो नागरिकांनी चांदूर रेल्वेच्या दिशेने जाणारा मुख्य मार्ग रोखला. यावेळी पुरूषांसोबत महिलांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. सर्व नागरिक रस्त्यांवर बसले होते. याचवेळी काहींनी रस्त्यावर टायर जाळले होते. याची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नागरिक आक्रमक झाले होते. पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून हटण्याबाबत सांगितले. मात्र ते हटले नाही. यावेळी पोलिस नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली. नागरिकही आक्रमक झाल्यामुळे काहींनी पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. त्यानंतर पोलिसांनीही सौम्य बळाचा वापर केला. यानंतर मात्र रस्ता मोकळा करण्यात आला. या प्रकारामुळे काही वेळ पोलिस आणि नागरिक आमने-सामने आल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. घटनेची माहिती मिळताच एसीपी मिलिंद पाटील, फ्रेजरपुरा ठाणेदार प्रमेष आत्राम यांच्यासह प्रचंड पोलिस कुमक घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी क्युआरटी दंगा नियंत्रक पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते.

पोलिसांसह नागरिकांनाही दुखापत : शनिवारीसकाळी पोलिस आणि गतिरोधकाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले नागरिक आमने-सामने आले होते. यामध्ये तीन पोलिसांना तसेच तीन ते चार नागरिकांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे घटनास्थळावर सांगण्यात आले.

अनेकदाकेली मागणी : आमच्यापरिसरातून मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावर गतिरोधक असावेत, अशी मागणी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे आम्ही केली आहे. मात्र अजूनही गतीरोधक झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी अपघात होऊन वृद्धेचा मृत्यू झाला. गतिरोधकाच्याच मागणीसाठी आम्ही सकाळी रस्त्यावर आलो असता पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, असा आरोप पारधीपुरा परिसरातील नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर या भागात गतिरोधक बसवले जाते की नाही,याकडे लक्ष लागले आहे.

अपघातास कारणीभूत व्हॅनचालकाला केली अटक
^शुक्रवारीसायंकाळीअपघातानंतर काही वेळातच व्हॅनचालकाला अटक करून व्हॅन जप्त केली होती. शनिवारी सकाळी गतिरोधकाच्या मागणीसाठी काही नागरिक रस्त्यावर आले होते. मात्र आता शांतता आहे. प्रमेषआत्राम, ठाणेदार, फ्रेजरपुरा.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...