आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रक-जीपची धडक; 6 प्रवासी ठार, 8 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रकची धडक एवढी जोरदार होती की मॅक्स वाहन चकनाचूर झाले. - Divya Marathi
ट्रकची धडक एवढी जोरदार होती की मॅक्स वाहन चकनाचूर झाले.
नागपूर- गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली येथे रविवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ६ जण ठार, आठ जण  गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात जीपचा चेंदामेंदा झाला.    

राजू नारायण कोडापे (३०, रा. पेठा), तुळशीबाई राजू कोडापे (२६, रा पेठा), सुधाकर वासू सेना (२५, रा. देचली), गोंतीबाई गौरय्या आत्राम (६०, रा. करजेली), रमाबाई विस्तारी सिडाम (५५, रा. करजेली), माधुरी गोरगुंडा (१५, रा. पातागुडम) अशी मृतांची नावे अाहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील एक लग्नसोहळा आटोपून गावकरी परतत असताना  उमानूर गावाजवळ हा अपघात झाला. सहा आसनी जीपमध्ये १४ वऱ्हाडी दाटावाटीने बसले होते. समोरून अचानक ट्रक येत असल्याचे पाहून चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दोन्ही वाहनांची  समोरासमोर धडक झाली. यात सहा जणांचा  घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आठ जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
 
पुुढील स्लाइडमध्ये, अपघातनंतर असे पडलेले होते मृतदेह.. 
बातम्या आणखी आहेत...