आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्झरी बसची दुभाजकाला धडक, अपघातात एक ठार, मोहदाजवळील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांढरकवडा- पांढरकवडा येथून जवळच असलेल्या मोहदाजवळ हैद्राबाद - अमरावती खुराणा ट्रॅव्हल्स एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याशेजारील डीव्हायडरवर धडकली. ही घटना मंगळवारी सकाळी वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एका २५ वर्षीय तरुण ठार झाला असून हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केल्या जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मंगळवार, दि. ऑगस्ट रोजी सकाळी मोहदा मार्गाने दररोज ये- जा करणारी खुराणा ट्रॅव्हल्स एमपी-१३-पी-२७९९ क्रमांकाची हैद्राबाद ते अमरावती ही खाजगी बस ३० ते ३५ प्रवाश्यांना घेऊन अमरावतीकडे जात होती. दरम्यान सकाळच्या सुमारास एका युवकाला वाचवण्याच्या प्रयत्नात मोहदा गावाजवळ चालकाने नियंत्रण सुटल्याने ही ट्रॅव्हल्स डीव्हायडरवर धडकली. ट्रॅव्हल्स मधील एकालाही दुखापत झाली नाही प्रवास्यांना प्रासंगिक दरवाजाने बाहेर काढण्यात आले. मात्र, ट्रव्हल्स जवळ एक युवक पोलिसांना मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे हा अपघात आहे की, घातपात असा संशय व्यक्त केल्या जात आहे. मृत युवक कारेगाव येथील रहिवाशी असून निलेश तुकाराम मेश्राम वय २५ वर्ष असे त्या तरुणाचे नाव आहे. पोलिसंानी तरुणाला वाचवतानाा अपघात झाल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...