आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटॅडोर उलटल्यामुळे २० भाविक जखमी, तीन गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- मध्यप्रदेशातील पळसखेडी येथून चिखलदऱ्याला देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक रविवारी २४एप्रिलला पळसखेळीला परत जात होते. दरम्यान चिखलदऱ्यापासून किलोमीटरवरील मडकी गावाजवळ भाविकांचा मॅटेडोअर उलटला. या वेळी मॅटेडोअरमधील २० भाविक जखमी झाले असून, प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री वाजताच्या सुमारास झाला. मध्यप्रदेशातील पळसखेळीचे हे भाविक मॅटेडोअर (क्रमांक एम. एच. २२ १४३५) ने चिखलदरा येथील देवी पॉइंटवर देवीचे दर्शन घेवून परतीच्या प्रवासाला लागले होते. मॅटेडोअर चालकाचे वळणावर वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जावून उलटले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातातील जखमींची नावे अशी :
पतीरामबेठे (७०), सतिश बारस्कर (१०), समोती धोटे (४५), रिचाय धोटे (५०), माला बेलसरे (६०), योगेश धोटे (१२), नरेश धोटे (१३), मनीषा गजानन खोदरे (१४), तुळसाबाई खडके (४०), पुजा धोटे (१६), ज्योती धोटे, भारत बेलसरे, रोहीत धोटे, नागेश धोटे, प्रिया महाजन, मालिनी धोटे, कृष्णा धोटे, श्याम भुसूमकरांसह अन्य व्यक्तींचा जखमींत समावेश आहे.