आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी-मिनीट्रक अपघात;१ ठार, २२ जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघात स्थळावर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य ट्रक. - Divya Marathi
अपघात स्थळावर अस्ताव्यस्त पडलेले साहित्य ट्रक.
परतवाडा- परतवाड्यावरूनअंजनगावसुर्जीच्या दिशेने बहिणीला घेऊन जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मिनी मालवाहू वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका २४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले. तसेच दुचाकीसोबत धडक झाल्यामुळे मालवाहू मिनीट्रक पलटी झाला. त्या मिनीट्रकमध्ये बसलेले २० मजूर जखमी झाले आहे. हा भीषण अपघात बुधवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास झाला आहे.

सुप्रिया संघपाल तेलमोरे (२४, रा. अंजनगावसुर्जी) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. याच वेळी सुप्रिया यांचा भाऊ रोहन पंुजालाल तेलमोरे (२१, रा. अंजनगावसुर्जी), संध्या तुकाराम कास्देकर (२१), पुरखा बालाजी भुसूमकर (४२), उजय चिलाठी भुसूमकर (५०), सुधिया पुरखा भुसूमकर (२०), ममता सोमा बारस्कर (१९), संुगती पुरखा भुसूमकर, चरखू पुरखा भुसूमकर (१९), समय रामचंद भुसूमकर (३५), रेखा रामचंद भुसूमकर (१५), अजय रामचंद भुसूमकर (१०), टिंकी तुकाराम कास्देकर (१२), भुलाई छोटालाल मावस्कर (३५), राखी किशोर चव्हाण (९), फुलाई किशोर चव्हाण (३०), फुले छोटेलाल भुसूमकर (३०), राजा छोटेलाल भुसूमकर, पाराखेडा (५), रजनी सुदामा मावस्कर (२१), राहुल सीताराम भुसूमकर (१०), भुता पुरखा भुसूमकर (१२, सर्व रा. पायखेडा), निर्मला लक्ष्मण उमरझरे (३२), सरस्वती संतोष धांदे (२१, दोघेही रा. कोयनरी) यांच्यासह अन्य जखमी झाले. पथ्रोटकडून येणाऱ्या मालवाहू वाहनामध्ये ही मंडळी बसली होती.