आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन एसटींची धडक; 30 प्रवाशी जखमी, तहसीलदारांनी दिली भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभुळगाव- समोरील गाडीला ओव्हरटेक करणे, एसटी बसचालकालाचा चांगलेच भोवले. साधारण बसचा वेग लक्षात आल्याने मागाहून येणाऱ्या जलद गाडीच्या चालकाने साधारण बसला मागून धडक दिली. ही घटना आज दि. ११ रोजी वाजताचे दरम्यान चिमणाबागापूर जवळ घडली. या अपघात दोन्ही बसमधील सुमारे ३० प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. तर मागून धडक देणाऱ्या बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

यवतमाळहून धामणगावकडे जाणारी साधारण बस क्रमांक एम.एच.०६-एस-८९६४ चिमणाबागापूर जवळ आल्यानंतर मागाहून यवतमाळ-धामणगाव जलद बस क्रमांक एम.एच.-४०-वाय-५२४९ च्या चालकाने तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतू वेगाचा अंदाज आल्याने चालक साईडने मागून धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. अचानक धडक बसल्याने प्रवाशी समोरील सीट्सवर जावून आदळून जखमी झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय बाभुळगाव येथे दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये वैशाली पचारे बाभुळगाव, हनुमंत गंगुलवार यवतमाळ, प्रभाकर पवार कोपरा, पवन मांढरे वेणी, पवन वैद्य चांदूर रेल्वे, पूनम बुरले मालखेड, नारायण चौधरी हस्तापूर, विनोद पंधरे पहूर, सागर आखरे पहूर, गिरीधर करोडे पहूर, सौरभ जिरापूरे पहूर, वसंत पेंदोर हस्तापूर, करिश्मा शिवरकर कोंढा, अक्षय देशमुख यवतमाळ, प्रभाकर पवार कोपरा, पुष्पा मोहुरले खरवांडरी, भाऊराव नाईक पाचखेड, प्रकाश उम्रतकर राणी अमरावती, खैरूननीसा शेख तारीक बाभूळगाव, रामबाई रेवते बाभूळगाव, अब्दुल मुतल्लीफ शे. मोजु मिटनापूर, पुरूषोत्तम अंबाझरे पिंपळखुटा, कुणाल दुधाणे पहूर, रूषिकेश सोनावने पहूर, नर्मदा सव्वालाखे मांजरखेड, माधूरी डोंगरे फाळेगाव, सपना राहुल चाफले वर्धा आदिंचा समावेश होता. एसटी बसच्या या अपघातासंबंधी लिलाधर दशरथ भगत, यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. जलद बस चालक रविंद्र उपाध्याय याचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...