आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार अडसडांंच्या वाहनाला अपघात; अडसड, चालक सुखरूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार अरुण अडसड वाहनाने श्री क्षेत्र तरोडा येथे जाताना गुंजी फाट्यासमोर बुधवारी १८ ऑक्टोबरला त्यांच्या वाहनाला अपघात झाला. सफारी वाहन रस्त्याच्या कडेला २० ते ३० फूट खाली कोसळले, सुदैवाने अरुण अडसड चालक दीपक कळपांडे हे बचावले.
 
माजी आमदार अरुण अडसड त्यांच्या सफारी एम.एच. २७ बी. ई. ३३३ या वाहनाने गाडीने शेतातून तरोडा येथील टेकडी श्री क्षेत्र सर्वेश्वर हनुमान मंदिरात जात होते. गुंजी फाट्यावर पांदण रस्त्यावरून ट्रॅक्टर समोर आल्याने अडसड यांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. अडसड यांचे वाहन रस्त्याच्या कडेला २० ते ३०फूट खाली कोसळले. 

त्यात गाडी समोरील बाजूने पडल्याने काचा फुटल्या अरुण अडसड अडकले. नशीब बलवत्तर म्हणून अडसड चालक दीपक यांना इजा झाली नाही. यापूर्वी तिवसा येथील कार्यक्रमातून परत येताना अडसड यांचा अपघात झाला होता. त्यातही त्यांना खरचटले नव्हते. मात्र वाहनाचे नुकसान झाले होते. त्यामुळे सर्वेश्वर टेकडीच्या हनुमंताची कृपा जनतेच्या आशीर्वादाने मी वाचलो, असे ते म्हणाले. यावेळीही शेतीचे काम आटोपून तरोड्यातील सर्वेश्वराच्या दर्शनाला जात होतो. त्यामुळे मला काही झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...