आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा ‘अतिक्रमण’निरीक्षकाविरुद्ध गुन्हा, कारवाईतील जप्त साहित्य घरात भरल्याचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने चार दिवसांपूर्वी शहरातील अतिक्रमित जागेवरील लोखंडी जाळ्या, पाइप असे साहित्य जप्त केले होते. त्यापैकी ६० किलो गंजलेले लोखंड मनपा गोदामात ठेवता स्वत:च्या घरात भरल्याप्रकरणी अतिक्रमण पथकाचे निरीक्षक विजय गावंडे यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी शुक्रवार, डिसेंबरला रात्री अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

मनपा कारवाईमध्ये जप्त झालेले साहित्य मनपाच्या गोदामात ठेवता अतिक्रमण विभागाचे निरीक्षक विजय गावंडे यांनी स्वत:च्या घरात भरल्याचे पुढे आले होते. या प्रकरणात महापालिका आयुक्तांनी गावंडेना ३० नोव्हेंबरलाच निलंबित करून फौजदारी कारवाईचेही अादेश दिले होते. त्यामुळेच प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे कुत्तरमारे यांनी शुक्रवारी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवार, २९ नोव्हेंबरला दुपारी शहरातील काही भागातील अतिक्रमण काढले होते. 

 

अतिक्रमण काढल्यानंतर जप्त केलेले साहित्य मनपाच्या गोदामात ठेवून तशी नोंद करणे आवश्यक आहे. मात्र बुधवारी झालेल्या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे निरीक्षक गावंडे यांनी अतिक्रमणाच्या ठिकाणाहून जे साहित्य ट्रकमध्ये भरले होते. तो ट्रकच घरासमोर उभा करून त्या ट्रकमधील लोखंडी जाळी, अँगल असे साहित्य काही व्यक्ती गावंडेच्या घरात भरत असतानाचे छायाचित्र व्हिडीओ पुढे आला होता. दरम्यान, विभाग प्रमुख कुत्तरमारे यांनी दिलेल्या तक्रारीत निरीक्षक विजय गावंडे यांनी जप्त केलेल्या साहित्यांपैकी लोखंडी जाळी अँगल असे एकूण ६० किलो लोखंड (किंमत हजार २०० रुपये) परस्परच घरात भरून अपहार केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या तक्रारीच्या आधाराव राजापेठ पोलिसांनी विजय गावंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहेे. 

 

अतिक्रमण निरीक्षक सवाईंवरही कारवाईचे संकेत 
अतिक्रमणहटवण्याची कारवाई केल्यानंतर जप्त केलेले साहित्य स्वत:च्या घरी नेणारे निरीक्षक विजय गावंडे यांच्यावर फौजदारी केल्यानंतर दुसरे निरीक्षक उमेश सवाई यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहे. प्राथमिक चौकशीनंतर गावंडे यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश अायुक्तांनी दिले होते. शिवाय अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी देखील उमेश सवाई यांना फौजदारीची तक्रार देण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र सवाई यांच्याकडून फौजदारीची तक्रार दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी सांगितले. 

 

अतिक्रमण पथकात कार्यरत निरीक्षकाने जप्त केलेले साहित्य मनपाच्या गोदामात ठेवता स्वत:च्या घरी घेऊन जाणे ही बाब उघडकीस येण्याची पहिलीच घटना आह. यातही महापालिकेने तक्रार केल्यामुळे अशा प्रकरणात मनपा निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची इतिहासातील पहिलीच वेळ असल्याची चर्चा गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी मनपा वर्तुळात सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...