आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळ : कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी खोडके प्रतिष्ठानची मालमत्ता सील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती एमआयडीसीत असलेली खोडके यांची सील लावलेली मालमत्ता त्याठिकाणी बँकेकडून लावण्यात आलेले बोर्ड. - Divya Marathi
अमरावती एमआयडीसीत असलेली खोडके यांची सील लावलेली मालमत्ता त्याठिकाणी बँकेकडून लावण्यात आलेले बोर्ड.
अमरावती - व्यवसाय सुरू करण्यासाठी खोडके अॅग्रो एनर्जी प्रतिष्ठानने सुमारे सात वर्षापूर्वी नागपूर नागरिक सहकारी बँकेकडून घेतलेले कोटी ४५ लाख रुपयांची परतफेड केल्याने बँकेच्यावतीने प्रतिष्ठानची मालमत्ता सील करून ताब्यात घेण्यात आली. बँंकेने एकूण कोटी १९ लाख ८८ हजार ७५१ रुपयांच्या वसुलीसाठी ही कारवाई केली आहे. 
 
खोडके अॅग्रो एनर्जी प्रा. ली. मध्ये गाडगेनगर खोडके प्लॉट येथील प्रशांत विनायक खोडके, सुचिता प्रवीण खोडके, राठी नगर शुभनिकेतन कॉलनी येथील मीना रणजीत जगताप, शिवकृपा कॉलनी अंबिका नगरातील मिलिंद चंद्रकात काकडे (पाटील), सीमा प्रशांत खोडके आदी भागीदारांचा समावेश आहे. या प्रतिष्ठानाचे कार्यालय व्हीएमव्ही रोडवरील राठी नगरात ए-वन कॉम्प्लेक्स दर्शविण्यात आले आहे. भागीदाराच्या या प्रकल्पासाठी खोडके अॅग्रो एनर्जी प्रा. ली. कंपनीने नागपूर नागरिक सहकारी बँक लिमीटेडच्या अमरावती येथील शाखेकडून २०१० मध्ये कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज घेत खोडके अॅग्रो एनर्जी हा प्रकल्प आरंभ केला. 
 
नागपूर नागरिक सहकारी बँकेकडून कर्ज घेताना अमरावती एमआयडीसी परिसरातील मौजे जेवड आणि खुर्द परिसरातील एफ-७ ही २१०० चौरस मीटरची पक्के बांधकाम करण्यात आली असलेली फॅक्टरी तसेच मॉडेल रेल्वे स्थानका समोरील गुलशन मार्केट मधील कार्यालय असलेली दुकाने गहाण ठेवण्यात आले होते. त्यानंतर या कर्जाची परतफेड केली जात नसल्याची बाब समोर आली. कोटी ४५ लाख रुपये मुद्दल तसेच त्यावरील व्याज मिळून एकूण कोटी १९ लाख ८८ हजार ७५१ रुपयांचा भरणा करण्याबाबत बँकेकडून खोडके अॅग्रो एॅनर्जी प्रा. लिमीटेड या प्रतिष्ठानला मार्च २०१५ रोजी प्रथम नोटीस बजाविण्यात आली. होती. कर्जाची रक्कम, त्यावरील व्याज, शिवाय नोटीसवर झालेल्या खर्च अादी रक्कम ६० दिवसात तातडीने भरण्याबाबत कळवले होते. मात्र संबंधितांकडून कर्जाची परतफेड शक्य होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च २०१७ रोजी दिलेल्या आदेशानुसार मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली. २००२ मधील सरफेशी अॅक्टनुसार २३ मे १७ रोजी एमआयडीसी तसेच गुलशन मार्केटमधील दोन मालमत्ता बँकेने सील केल्या. सोमवारी (दि. २२)एमआयडीसी परिसरील एफ-२७ ही मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली. नागपूर येथील बँकेचे पथक पोलिस संरक्षणात एमआयडीसी क्षेत्रातील कंपनीत पोहचले. कर्जाच्या परतफेडीची रक्कम मिळण्याची शक्यता कमी असल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मालमत्तेची मोजमाप केली. २१०० चौरस मीटर एवढ्या विस्तीर्ण परिसरात एफ-२७ या क्रमांकाच्या मालमत्तेतील खुली जमीन तसेच बांधकाम असलेला परिसराची नोंद सील करताना घेण्यात आली. यासह गुलशन मार्केट मधील ५,६,७,८,९,१०,११,१२ १३ आदी दुकाने १५९९.२३ चौरस फुट बांधकाम क्षेत्रफळ असलेली जागा ताब्यात घेण्यात आली. 
नागपूर येथील बँकेचे विशेष वसुली अधिकारी मोहन शाह यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. अॅग्री प्रॉक्टड्स प्रा. ली. मधील प्लॉन्ट आणि मशिनरी तसेच खोडके अॅग्री एनर्जी या प्लॉन्ट आणि मशिनरी आदी दोन्ही सील करण्यात आले. कारवाई दरम्यान बँकेच्या पथकाकडून दोन्ही मालमत्ता असलेल्या ठिकाणी नोटीस लावण्यात आली आहे. शिवाय मालमत्ता ताब्यात घेतली असल्याचे नोटीस बोर्ड कंपनी तसेच गुलशन मार्केट परिसरात लावण्यात आले आहे.
 
बँकेडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या अाहे. बड्या आसामींकडून मोठ्या रकमचे कर्ज वसूल केले जात असल्याने जप्त कारवाईची जोरदार चर्चा आहे. याबाबत बँकेचे वसुली अधिकारी मोहन शाह यांच्याशी संपर्क केला मात्र व्यस्ततेमुळे त्यांनी माहिती नंतर देणार असल्याचे सांगितले. 
 
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला आदेश 
खोडके अॅग्रो एनर्जी प्रतिष्ठानकडून कर्जाच्या रकमेची परतफेड केली जात नसल्याने बँकेने दोन वर्षांपूर्वी रितसर नोटीस दिली. मात्र त्याकडे प्रतिष्ठानकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सरफेशी अॅक्ट २००२ चा अाधार घेत बँकेने जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे धावा घेतली. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मालमत्ता सील करण्यात आली. 
 
१० कोटींवर घेणी 
खोडके अॅग्रो एनर्जी या प्रतिष्ठानाने बँककडून कोटी ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. ४.४५ कोटी रुपयांचे मुद्दल तसेच व्याज पकडून ही रक्कम दहा कोटी रुपयांच्या अासपास असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. 
 
अशी आहे बोर्डवर सूचना 
ही मालमत्ता प्राधिकृत अधिकारी नागपूर नागरिक सहकारी बँक मुख्य कार्यालय नागपूर यांनी सरफेशी अॅक्ट २००२ अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार ताब्यात घेतली अशी सूचना लिहली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...