आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांचा विभागीय समिती सदस्य सोमा वेलादी अटकेत, सोमावर होते 16 लाखांचे बक्षीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रासह तीन राज्यांमधील अबुजमाडच्या क्षेत्रात सक्रिय असलेला कुख्यात नक्षलवादी पवन ऊर्फ सोमा वेलादी (३५) याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली पोलिसांचे अलीकडच्या काळातील हे सर्वात मोठे यश मानले जात असून सोमावर १६ लाखांचे बक्षीस होते, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानातील सूत्रांनी दिली.  
 
गडचिरोली पोलिसांनी गडचिरोली आणि बिजापूर सीमेवर कार्यरत सांड्रा दलममधील तीन नक्षलवाद्यांना एप्रिल महिन्यात अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून गरियाबंद डिव्हिजनल कमिटीचा सदस्य असलेल्या सोमाला अटक करण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे सोमाला अटक करताना त्याने कुठलाही प्रतिकार केला नाही. 
 
त्याच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे मानले जाते. सोमा हा मूळ छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील परसेगुंडी येथील रहिवासी असून तो नक्षलवाद्यांमधील अतिशय अनुभवी सदस्य होता. त्याने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील प्लाटून क्रमांक ३, मिलिटरी दलम तसेच बिजापूरमधील सांड्रा दलम व प्लाटून क्रमांक २२ मध्ये काम केले आहे. मागील २० वर्षांत त्याचा अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. त्याच्याकडे सध्या गरियाबंद डिव्हिजनल कमिटीचा सदस्य म्हणून जबाबदारी होती. काही काळ तो वरिष्ठ नक्षल नेत्यांचा अंगरक्षक म्हणूनही तो कार्यरत होता.
 
पुढील स्लाइडवर वाचा, छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवादी महिलेसह तिघांचा मृत्यू...
बातम्या आणखी आहेत...