आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी औषध फवारणी मृत्यू प्रकरण: 6 कंपन्यांची कीटकनाशके जप्तीचा कृषी विभागाचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अवैध कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या सहा कंपन्यांची कीटकनाशके जप्त करून त्या कंपन्या वितरकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने नागपूर खंडपीठात दिली. 
 
फवारणी मृत्यूच्या घटनांबाबतच्या याचिकेच्या सुनावणीत कृषी विभागाच्या मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. या याचिकेवर कृषी विभागाच्या प्रधान सचिवांसह यवतमाळ जिल्हाधिकारी आणि कृषी आयुक्तांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. परवाना नसताना कीटकनाशकांची विक्री केल्याबद्दल एकूण व्यक्तींवर कारवाई झाल्याचेही विभागाने नमूद केले आहे. फवारणीमुळे बाधा होऊन मृत्यू झालेल्या २१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारडून भरपाई देण्यात येत असून १९ कुटुंबांना प्रत्येकी लाखांची मदत देण्यात आल्याचे कृषी विभागाने नमूद केले. 
 
एचटी कापूसप्रकरणी नागपुरात तीन एफआयआर : हर्बिसाइड टॉलरंट (एचटी) म्हणजेच तणनाशक प्रतिरोधक बियाण्यांची विदर्भात यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून शेतकऱ्यांमध्ये हे बियाणे चोर बीटी म्हणून प्रसिद्ध आहे. स्वदेशी जागरण मंचाचे महाराष्ट्र संयोजक अमोल पुसदकर यांनी या अवैध बियाण्यांचा प्रकार जानेवारीत सर्वप्रथम उघडकीस आणला. कृषी विभागाने गेल्या आठवड्यात त्याची गंभीर दखल घेत नागपूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केल्यावर सावनेर, पारशिवनी आणि नरखेड अशा तीन पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणे कुठून कसे आले, याचा माग काढला जात आहे. 
बातम्या आणखी आहेत...