आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकूण 244 वीजचोरांवर महावितरणची कारवाई, वीज चोरांविरूध्द मोहिम तीव्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - विजेचा अनधिकृत वापर करणारे महावितरणच्या रडारवर असून गुरुवारी जिल्ह्यात एकाच वेळा धाडी टाकून २४४ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीज चोरांविरुद्ध महावितरणने आक्रमक भूमिका घेत महिन्याच्या आत केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. याअगोदर ऑगष्ट मध्ये ३१४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली होती.
 
गुरुवारी महावितरणने टाकलेल्या धाडीत यवतमाळ जिल्ह्यातील २२४ ठिकाणी थेट विजचोरी होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध विद्युत कायदा १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तर २० ग्राहकांनी अनियमित वीजेचा वापर करत असल्याचे आढळून आल्याने विद्युत कायदा कलम १२६ नुसार त्याच्यावरही दंड आकारण्यात येणार आहे. 
 
दरम्यान यावेळी टाकलेल्या घाडीत यवतमाळ विभागातील ८१ ग्राहकांचा समावेश आहे. यामध्ये यवतमाळ शहर ४, यवतमाळ ग्रामीण ११, आर्णी ३१, कळंब २, राळेगाव १०, नेर ११ आणि बाभूळगाव अशा एकून ७४ ठिकाणी हुक टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करत असल्याचे आढळून आले आहे , तर याच विभागातील यवतमाळ शहर २, कळंब २, राळेगाव आणि बाभूळगाव असे ग्राहक अनियमीत वीजेचा वापर करत असल्याचे आढळून आले आहेत. 
 
पुसद विभागातील दारव्हा १०, दिग्रस १२, महागांव १८, उमरखेड १०, ढाणकी १५ अशा एकून ६५ ठिकाणी हूक तसेच मीटरमध्ये फेरुफार करून वीजचोरी करत असल्याचे आढळून आले आहे. तर दारव्हा २, दिग्रस २, महागांव १, उमरखेड आणि ढाणकी असे ग्राहक अनियमीत वीजेचा वापर करत असल्याचे आढळून आले आहेत. पांढरकवढा विभागातील अनधिकृत वीजेचा वापर करणाऱ्यापैकी पांढरकवढा ७, वणी ७, घाटंजी ४१, मारेगांव ७, झरी २३ अशा एकून ८५ ठिकाणी हुक टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करत असल्याचे आढळून आले आहे. तर याच विभागातील झरी आणि मारेगाव असे ग्राहकअनियमीत वीजेचा वापर करत असल्याचे आढळून आले आहेत. 

ग्राहकाने वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिट विजेचे बिल वसूल व्हावे, अनाधिकृत विजेच्या वापराला आळा बसावा, नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, याशिवाय विजचोरांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी यवतमाळ जिल्ह्यात काल अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आकस्मिक मोहिम राबविण्यात आली. लाईन स्टाफ, कार्यकारी अभियंते, अधीक्षक अभियंता असे सर्वांनी मिळून मोहिमेत भाग घेतला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...