आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिकेत लेटलतीफांवर 1 एप्रिलपासून कारवाईचा धडाका, सर्वांना बजावल्या नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिका कार्यालयात कारवाईचा धडाका आयुक्त हेमंत पवार यांच्याकडून आरंभ करण्यात आला. एप्रिलपासून आरंभ करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान सात दिवसात तब्बल १२४ लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये लेटलतीफ असलेले प्रभारी सहाय्यक आयुक्तांना देखील नोटीस देण्यात आली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजाबाबत शिस्त निर्माण व्हावी म्हणून आयुक्त हेमंत पवार यांच्याकडून कडक उपाययोजना केल्या जात आहे. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर प्रशासनातील शिस्तीला आयुक्तांकडून प्राधान्यक्रम दिल्या जात असल्याचे चित्र आहे. कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला असून सात दिवसात तब्बल १२४ अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आले आहे.

साधारणत: सर्वच विभागात आयुक्त कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दररोज माहिती घेत आहे. नगर सचिव विभाग, पाणी पुरवठा, स्थानिक संस्था कर, सहाय्यक संचालक नगर रचना, आरोग्य विभाग, कार्यकारी अभियंता-२, कर विभाग, एनयुएलएम, सामान्य प्रशासन विभाग, पशुशल्य विभाग, उद्यान विभाग, लेखा विभाग आदी विविध विभागात कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याची बाब समोर आली. बुधवार मार्चला आरोग्य विभागातील २०, सामान्य प्रशासन विभागातील १३, आरोग्य विभागातील ४, पशुशल्य विभागातील ४, उद्यान विभागातील ४, लेखा विभागातील १४, विधी विभागातील लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये विद्या बारसे, धिरज माकोडे, एस. बी. जाधव, जी. एस. घुगे, पुष्पा उतखेडे, देवेंद्र बारस्कर, इश्याद खान, वृषाली गावंडे, वर्षा गुहे, संजय बगाडे, नुरसत खान, आतिश यादव, अनमोल अघमे, शरद खडसे, चैताली ढवळे, वर्षा बुडखले, प्रतिक कोल्हापुरे, अर्पणा दोदलकर, अश्विनी कच्छाव, कपील इंगोले, शालिनी पखाले, ज्योती रेड्डी, नितीन चाबुस्कवार, विकास कोराट, श्याम पुसाम, राजकुमार इंगळे, जीवन वाकपैंजन, अंकुश गुल्हाणे, आशिष बागडे, अशफाक सिद्धीकी, गजेंद्र हर्षे, प्रमोद मोहोड, सरीता गेडाम, आर. जे. सोळंके, अंबु तंबोले, मनिष गडवाले, पल्लवी तट्टे, गुणसागर गवई, गिरीष चव्हाण, अब्दूल रफीक, संतोष डुलगज, रामधन जाधव, गजानन बडे, दामोधर भालसाखर, उत्तम नाईक, आर. एम. बागाेकर, संगीता बोरवाल, उमेश फतवानी, आशिष सातोकार, अजय चव्हाण, निर्मला खोब्रागडे, धनंजय पाठक, कुणाल बांबल, ज्योती पारडशिंगे, रितेश देसाई, अनुप सारवान, रुपेश गोलाईत, रवींद्र बोरकर, भूषण खंडारे, ए.एन. पाटील, सविता पाटील, पंकज बैस यांचा समावेश आहे.

गुरुवार एप्रिलला बाजार परवाना विभाग, अतिक्रमण निर्मुलन विभाग, झोन क्रमांक ३, १, एनयुएलएम आदी कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान ३१ लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये केशव ठाकरे, रामदास वाकपांजर, शेखर ताकपीठे, रहीमाबेग बिलकीसबानो, आदेश अढाऊ, नम्रता काटकर, राहुल बोबडे, रवी पाटमासे, आदेश तांसेकर, अमिन नूर, श्रीकांत गोहर(निलंबित कर्मचारी), राजेश निंधाने(निलंबित कर्मचारी), जितू टांक(निलंबित कर्मचारी), शारदा सोनटक्के(निलंबित कर्मचारी), चिमन गादे (निलंबित कर्मचारी), कल्पना ढेणवाल, संदीप गोहर (निलंबित कर्मचारी), राजेंद्र मेश्राम, आर. बी. मालटे, गणेश जुनघरे, सोनू मेश्राम, अनिता चव्हाण, शोमन खान, मयुरी दुचक्के, पल्लवी जमपुरकर, अरुणा मनोहरे, मनिषा शेंडे, सिंधू मोटघरे, सुषमा किणगावकर, सुषमा डोळण, प्रफुल्ल ठाकरे यांचा समावेश आहे.
 
प्रभारी सहाय्यक आयुक्त लेट लतीफ : महापालिकेच्याभाजी बाजार झोन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त पदाचा प्रभार मंगेश वाटाणे यांच्याकडे आहे. झोन कार्यालयाचे विभाग प्रमुख असताना देखील सहाय्यक आयुक्त वाटाणे हेच लेटलतीफ कर्मचारी असल्याचे आढळून आले.
 
विविध विभागात शुक्रवारी २६ कर्मचारी लेटलतीफ
विविध विभागात करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान शुक्रवार एप्रिलला एकूण २६ कर्मचारी लेटलतीफ आढळले. यामध्ये शेख इसराईल शे. इस्माइल, शे. मुश्ताक शे. तंवगर, नारायण भांदेकर, एस. सी. मांडवधरे, एस. एच. खडसे, दिलीप नागदिवे, ए. एस. वानखडे, एस. बी. वऱ्हाडे, पी. व्ही. देशमुख, बी. एन. जोगी, रवींद्र चांडाले, नितीन चावरे, संजय कंकाळे, एस. एल. देशमुख, ऋतिका देशमुख, वैष्णवी टवलारे, मंगेश वाटाणे, रेखा बैस, राजेश तंबोले, शेख राजीक, आरती चंदेल, चैतन्य काळे, इरशाद खान, कपील इंगोले, आर. एम. पवार, एम. बी. जाधव यांचा समावेश आहे.
 
बातम्या आणखी आहेत...