आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती विधेयक दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मान्यता देण्यात आली. या उपचार पद्धतीचे विधेयक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले. ते मंजूर करण्यात आले. महाराष्ट्राच्या
वैद्यकीय क्षेत्रातील ही महत्त्वाची घटना मानली जाते.

‘ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती ही लोकप्रिय चिकित्सा पद्धत आहे. या चिकित्सा पद्धतीला तिच्या विकासासाठी योग्य ती संधी निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच या चिकित्सा पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे विनियमन करणे आवश्यक आहे. याच दृष्टीने महाराष्ट्रात ही पद्धती लागू करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू करत आहोत,’ असे तावडे यांनी सांगितले. ॲक्युपंक्चर ही शरीरावरील विशिष्ट बिंदूवर त्वचेमध्ये बारीक सुया टोचून त्याद्वारे वेदनामुक्त करणारी किंवा आजारपण बरी करणारी एक चिकित्सा पद्धत आहे. ही एक महत्त्वाची प्राकृतिक स्वरूपाची चिनी पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीच्या वापरास सुमारे अडीच हजारहून अधिक वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी.

या चिकित्सा पद्धतीची संकल्पना ही अतिप्राचीन काळी विकसित झाली असावी असा अनुमान चिनी प्रमाणावरून काढता येतो असे तावडे यांनी सांगितले. या चिकित्सा पद्धतीचा विकास, अध्यापन तसेच व्यवसाय नियमनाच्या दृष्टीने विधेयकात तरतूद करण्यात आली असल्याचेही तावडेंनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...