आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी बाळंतिणीला रुग्णवाहिकेविनाच सुटी, सामाजिक कार्यकर्त्‍यांनी केली मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - आदिवासी महिलेला प्रसुतीनंतर बाळंतिणीला घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असा नियम आहे. परंतु मेळघाटातील आदिवासी महिलेला प्रसुतीनंतर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची घटना शनिवारी ऑक्टोबरला येथील उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आली. दरम्यान, ही बाब गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर वर्गणी गोळा करून महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र रुग्णालय प्रशासनाने या महिलेने बळजबरीने ‘डिस्चार्ज’ घेतल्याचे म्हटले आहे. 
 
चिखलदरा तालुक्यातील खटकाली येथील प्रियंका गणेश धुर्वे या महिलेला प्रसृतीसाठी अचलपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

पाच ऑक्टोबर रोजी प्रियंकाची प्रसूती होऊन तीने मुलीला जन्म दिला. रुग्णालयाने वॉर्ड क्रं. १८ मध्ये तिची आरोग्य व्यवस्था केली होती. ७२ तासाने तिला सुटी देऊन गावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार होती. मात्र प्रियंकाने जबरदस्तीने रूग्णालयातून सुटी घेवून गावाकडे निघाली. आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे या बाळंतीण महिलेसह तिच्या बाळाला घरी पोहोचवण्याची व्यवस्था करावी लागते. प्रियंकाच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका उपलब्ध करून देता सुटी दिली. त्यानंतर प्रियंका रूग्णालयातून गावाकडे जाण्यासाठी चिखलदरा स्टॉपवर खासगी वाहनाच्या प्रतिक्षेत बसली होती. दरम्यान शहरात वादळी वारा पाऊस सुरु झाल्याने प्रियंका मुलीसह आडोश्याचा शोध घेत होती. नागरिकांकडे मदत मागत होती. ही बाब मणिराम कास्देकर, विशाल खानझोडे, मुश्ताक अहेमद यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वर्गणी जमा करुन या प्रियंकाला खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली तिची रवानगी गावाकडे करण्यात आली. विशेष म्हणजे हतरू येथील मानु सेलुकर या ५५ वर्षाच्या रुग्णाने आजारी अवस्थेत बडनेऱ्यावरून पायी परतवाडा गाठले होते. 
 
आरोग्यविभागाचे कामकाज संताप जनक: उपजिल्हा रूग्णालयात बाळंतीण महिलेला सुखरूप पोहोचून देण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे आवश्यक असतांना त्यांनी जाणीवपूर्वक या बाबीकडे दुर्लक्ष केले. ही बाब संतापजनक आहे,अशी प्रतिक्रियासामाजिक कार्यकर्ते विजय थावानी यांनी व्यक्त केली. 
 
नातेवाईकांकडे जाते म्हणून महिलेने सुटी घेतली 
उपजिल्हा रूग्णालयात प्रियंका धुर्वे हिची ऑक्टोबरला प्रसूती झाली. प्रसुतीनंतर महिलेला ७२ तासानंतर सुटी दिल्या जाते. त्यामुळे तिला पाठवण्याकरिता रविवारी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आज तिने नातेवाईकाकडे जातो म्हणून आग्रह करून रूग्णालयातून स्वत: सुटी घेतली,अशी माहिती अचलपूर येथील उपजिल्हा रूग्णालयवैद्यकिय अधीक्षक डॉ.जाकीर यांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...