आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv. Khandalkar’s Death : NHRC Transfers Case To State Commission

खंडाळकर प्रकरण राज्य मानवाधिकार आयोगाकडे सुपूर्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीकांत खंडाळकर यांच्या कथित आत्महत्येचे प्रकरण केंद्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य आयोगाकडे हस्तांतरित केले आहे. हा राज्य आयोगाचा विषय असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

२९ नोव्हेंबर २०१५ रोजी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. खंडाळकर यांचा मृतदेह न्यायालय परिसरात आढळून आला होता. त्यांनी सातव्या माळ्यावरून उडी घेतल्याचे आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मृतदेहाचा डमी वापरूनही तांत्रिक तपास केला. मात्र, त्यात अॅड. खंडाळकर यांनी आत्महत्याच केल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. खंडाळकर यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांना कुठलाही गंभीर आजार नव्हता. त्यामुळे हे प्रकरण रहस्यमय बनलेले आहे. आरटीआय कार्यकर्त्या अंकिता शाह यांनी यासंदर्भात केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली हाेती. त्यावर आयोगाने राज्य आयोगाला या प्रकरणाची सुनावणी करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता राज्य आयोगापुढे सुनावणी होणार आहे. अॅड. खंडाळकर यांचा खून झाल्याचा संशय शहा यांनी व्यक्त केला आहे.