आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

२० रूपयांची चोरी, १९ वर्षांनंतर शिक्षा, १९९७च्या प्रकरणातील महिलेला न्यायायालयाने सुनावली कोर्ट उठेपर्यंतची सजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील एका महिलेविरुद्ध २० रुपये चोरीचा आरोप तब्बल १९ वर्षांनंतर सिद्ध झाल्याने येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी (दि. १)आराेपी महिलेला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा ठोठावली.
शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या अशोक पुंडलिकराव चरपे यांच्या घरातील टिकास, पावडे घमिले असे साहित्य एका महिलेने चोरून नेल्याची तक्रार मे १९९७ रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चोरी करणाऱ्या महिलेचे नाव पुढे आले. मात्र ती महिला त्यावेळपासून पसार होती. तिचा मागील काही दिवसांपासून पोलिसांनी पुन्हा शोध घेणे सुरू केला. दरम्यान, बडनेरा येथील गांधी विद्यालय परिसरात ती राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी शोधून तिला ताब्यात घेतले. मात्र तिने मागील काही वर्षांपूर्वी धर्म बदलला आहे, त्यामुळे तिच्या नावातसुद्धा बदल झाला आहे. दरम्यान, या महिलेविरुद्ध वॉरंटही निघाला होता. त्यामुळे कोतवालीच्या वॉरंट पथकाचे शेखर गेडाम, प्रकाश मेश्राम यांनी ३० जूनला या महिलेला अटक केली होती. तिच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यामुळे पोलिसांनी अटक केल्यानंतर त्या महिलेला शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. प्रकरणाच्या सुनावनीदरम्यान न्यायालयात या महिलेविरुद्ध दाेष सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने या महिलेला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून अॅड. खरड यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी म्हणून एएसआय संजय पाचंगे यांनी काम पाहिले, अशी माहिती पोलिस आयुक्तालयाच्या सीएमसी सेलकडून देण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...