आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांनंतरही हरिसाल व्हिलेजच! १०० दिवसांत डिजिटल व्हिलेजची होती घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिसाल - मेळघाटातील हरिसाल हे गाव शंभर दिवसांत संपूर्णत: डिजिटल व्हिलेज करण्याची राज्य सरकारची घोषणा केवळ घोषणाच ठरली आहे. पाच महिन्यांनंतरही हरिसाल डिजिटल होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिका दौऱ्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत बैठक झाली. त्यात भारतातील दुर्गम भागातील गाव डिजिटल करण्याचे मायक्रोसॉफ्टने मान्य केले होते. त्यानुसार मेळघाटातील अमरावती- बैतूल मार्गावरील हरिसाल या गावाची निवड झाली होती.

इथे अडले डिजिटल व्हिलेजचे घोडे
हरिसालमध्ये इंटरनेट जुळणी व मोबाइल सिग्नल देणाऱ्या टॉवरच्या उभारणीची तयारी पूर्ण झालेली आहे. पण केवळ क्रेन उपलब्ध होत नसल्याने त्याचे काम अडलेले आहे.
‘टेलिव्हिजन व्हाइट स्पेस’ या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी केंद्राचा परवाना अद्याप मिळालेला नाही. या संदर्भातील कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सीएमओचे अधिकारी नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत.

सध्या हे काम सुरू
सध्या अत्याधुनिक संगणक प्रणाली व अॅप्लिकेशनवर काम सुरू आहे. इंटरनेटसाठी ऑप्टिकल फायबर केबल हरिसालपर्यंत पोहोचली आहे. २४ तास वीजपुरवठ्यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत.

पथक येणार
मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञांचे पथक येथे पूर्णवेळ नियुक्त व्हावे यासाठी कंपनीला कळवले जाईल. ते आल्यास हरिसाल लवकर डिजिटल होण्यास मदत होईल.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती