आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Maggi Haldiram Products On Food And Drugs Administration Radar

मॅगी पाठोपाठ हल्दीरामची उत्पादने ‘अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या’ रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मॅगी’पाठोपाठ हल्दीरामची उत्पादने राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या तपासणी रडारवर आली आहेत. नागपुरातून काही नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. अन्न व अाैषध राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनीही हल्दीरामच्या उत्पादनांची तपासणी करण्याचे अादेश दिले अाहेत.

अन्न व औषधी प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, , तीन दिवसांपूर्वी हल्दीरामकडून खाद्यपदार्थांचे व इतरही अनेक कंपन्यांचे पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यास त्यांनी नकार दिला.

अमेरिकेत ‘नो एंट्री’
अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने गेल्या ५ महिन्यांत बंदी घातलेले सर्वाधिक पदार्थ भारतीय कंपन्यांचे आहेत. बुरशी, जिवाणू व कीटकनाशकांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे ‘मानवी आहारासाठी अयोग्य’ असा शेरा मारत या पदार्थांना अमेरिकेने ‘नो एन्ट्री’ केली आहे. यात सर्वाधिक उत्पादने 'हल्दीराम'ची आहेत.