आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी परिसरात गर्दी केली होती.

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा- उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या भावाने संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली असून, कारवाईची मागणी केली आहे.या मुळे काही काळ पोलिस ठाणे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तक्रारकर्ते प्रवीण पोल्हाड यांनी मंगळवारी रात्री भाऊ, प्रफुल्ल राजेंद्र पोल्हाड (३६) रा. भांबोरा यांची तब्येत ठिक नसल्याने डॉ. संदीप देशमुख यांच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डाॅ. देशमुख यांनी प्रवीण यांना औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये पाठवले. मात्र औषध आणल्यानंतर डाॅक्टर जागेवर उपलब्ध नव्हते, तर मृतक प्रफुल्ल हा बाथरुमध्ये पडून होता. काही वेळानंतर रुग्णाची तब्येत आटोक्यात येत नाही, हे पाहून डॉ. देशमुख यांनी रुग्णाला शासकीय दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले.

रात्री दहा वाजता शासकीय दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी तपासून रुग्णाला मृत घोषित केले. मृतकाच्या भावाने खासगी डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून भावाच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरले. जोपर्यंत संबंधित डॉक्टरला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पावित्रा मृतकाच्या नातेवाईकांनी घेतला. ठाणेदार दिनेश शेळके यांनी पोलिस बंदोबस्त वाढवून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर रुगणाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...