आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Againt Ravan Dahn Petition Rejected By Nagpur Court

रावण दहनबंदीची याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यास 25 हजारांचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विजया दशमीला रावण दहन बंद करण्याबाबत दाखल केलेली जनहित याचिका नागपूर खंडपीठाने गुरुवारी फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्याला २५ हजारांचा दंड ठाेठावून ही रक्कम दोन आठवड्यांच्या आत मुख्यमंत्री दुष्काळ मदत निधीत जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी दिले.

मुंबई पोलिस कायद्यातील कलम १३१, १३४ आणि १३५ प्रमाणे कुठल्याही व्यक्ती, प्रेत किंवा आकृत्या यांच्या प्रतिमा जाळणे गुन्हा आहे. तरीही नागपुरात दरवर्षी रावण दहनाचे कार्यक्रम घेतले जातात, असा अाक्षेप घेत नागरी हक्क संरक्षण मंचचे केंद्रीय अध्यक्ष जनार्दन मून यांनी त्याविराेधात याचिका दाखल केली हाेती. रावण दहनामुळे आग लागून घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी,’ अशी मागणी याचिकेत करण्यात अाली हाेती.

काही दिवसांपूर्वीच केरळ येथील कोल्लम मंदिरातील जुन्या प्रथेनुसार फटाके फोडण्यात आल्यामुळे लागलेल्या भीषण आगीत मनुष्यहानी झाली, याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात अाले हाेते. मात्र या जनहित याचिकेत कुठलाही जनहिताचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.