आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी नगरसेवकाकडून कोरड्या विहिरीमध्ये आंदोलन, टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शहरातील वाघापूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात जिवन प्राधिकरणाची पाइपलाइन टाकण्यात यावी, तसेच नगरपालिकेने दररोज टँकरने पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी सोमवार, १० एप्रिल रोजी प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने कोरड्या विहिरीत आंदोलन करण्यात आले.
 
वाघापूर परिसरातील चौसाळा मार्गावर असलेल्या प्रिया रेसिडेन्सी या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात जवळपास ५०० ते ६०० लोकांची वस्ती आहे. परिसरात तीन ते चार विहिरी आहे. मात्र अनेक विहिरींचा जल स्तर खोलात गेले आहे. त्यामुळे नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा उपयोग करावा लागत आहे. परिसरातील काही विहिरींमध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही, अशी परिस्थिती उद््भवलेली आहे. त्यामुळे जिवन प्राधिकरणाचे या परिसरात पाण्याची टाकी उभारावी, त्याचबरोबर पाइपलाइन टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच नगरपालिकेने दररोज टँकरने या परिसरात पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी प्रहार सामाजिक संघटनेचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे यांनी कोरड्या विहिरीत अनोखे आंदोलन केले.

या वेळी प्रहार संघटनेचे राहुल झाडे, संजय भगत, आकाश समोसे, उमेश गावंडे, स्वप्निल उजवने, गोपाल काकडे, वैभव रणधिवे, धीरज सोनटक्के, सचिन इंगोले, आकाश गावंडेसह मंगेश गाडगे, ओमप्रकाश चव्हाण, दिनेश सोनुले, प्रकाश पेंदोर, प्रमोद समर्थ, अतुल गुलालकर, राजेश शिकरवार, प्रमिला राऊत, ललिता चव्हाण, कमल राठोड, पार्वताबाई उघडे, ज्ञानवती तिवारी, दुर्गा जाधव, नितू शिकरवार यांच्यासह महिला नागरिक उपस्थित होते.
 

तीन दिवसातून एकदा येतो टँकर
चौसाळामार्गावर असलेल्या प्रिया रेसिडेन्सी या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेला तक्रार दिली. त्यानंतर नगरपालिकेने टँकरद्वारे या परिसरात पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, ५०० ते ६०० लोकवस्तीत असल्याने परिसरात तीन दिवसांआड पाण्याचा टँकर येतो. परंतु अनेकांना त्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...