आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरीसह, हरभऱ्याचे दर वाढले, धामणगाव रेल्वे येथे कापूस प्रति क्विंटल ५,३०० रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घटलेली आवक वाढलेल्या मागणीमुळे तूर, हरभरा, कापूस उडदाच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. दरम्यान, चांदूर रेल्वे बाजार समितीत शनिवारी १६ एप्रिलला तुरीला विक्रमी दहा हजार ११ रुपये तर दर्यापूर बाजार समितीत हरभऱ्याला विक्रमी हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. धामणगाव रेल्वेच्या खासगी बाजारात कापसाला सर्वाधिक पाच हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
जिल्ह्यात झालेल्या अल्प पावसामुळे तूर, सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा या प्रमुख पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक सोयाबीनने जबर झटका दिल्यानंतर हाती आलेल्या तूर, उडीद, मुग, सोयाबीन, हरभरा आदी सर्वच पिके विकण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ऐन हंगामातच भाव घसरलेले असताना शेतमालाची विक्री केली आहे. त्यातच तूर हरभऱ्याचे समाधानकारक उत्पादन फक्त बागायत पट्ट्यात झाले आहे. कोरडवाहू पट्ट्यात या दोन्ही सध्या भाव वाढलेल्या शेतमालाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे.

कोरडवाहू पट्ट्यात तुरीचे एकरी उत्पादन एक पोत्यापासून सरासरी तीन पोत्यांपर्यंत झाले आहे. हरभऱ्याचे उत्पादन एकरी एक ते चार पोत्यांपर्यंत झाले आहे. जानेवारीमध्ये तुरीचा हंगाम सुरू झाल्यानंतर तुरीचे दर कमाल ९,४०० रुपयांपर्यंत गेले होते. त्यानंतर ऐन हंगाम भरात असताना तुरीच्या दरात घसरण होऊन तुरीला सरासरी सहा ते सात हजार रुपये दर मिळाले. दरम्यान, याच काळात बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीमुळे तुर हरभरा विकून टाकला. दरम्यान, होळी नंतर तूर हरभऱ्याच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. परंतु केवळ साठवणूक करणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांकडेच प्रामुख्याने तूर हरभरा असल्यामुळे या भाववाढीचा फायदा जिल्ह्यात मोजक्या शेतकऱ्यांना होत आहे. दरम्यान, तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता
खरेदीदारांमध्ये व्यक्त केली जात आहे.

दर्यापूरबाजार समितीत उडीद १२ हजार रुपयांवर : जिल्ह्यातीलदर्यापूर तालुक्यात मुग आणि उडीद या पीकांचे प्रमुख उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी पावसाअभावी पेरण्या लांबल्यामुळे याचा दोन्ही पिकांवर मोठा परिणाम झाल्याने ९० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. योग्यवेळी पेरणी झालेल्या शेतकऱ्यांनाही मुग आणि उडदाचे अल्प उत्पादन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या दोन्ही पिकांची आवक नसल्यासारखी आहे. दरम्यान आज दर्यापूर बाजार समितीत उडीदाच्या चार पोत्यांची आवक झाली. उडीदाला कमाल १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

चांदूररेल्वे नांदगाव खंडेश्वर येथे हरभऱ्याला अल्पदर : जिल्ह्यातीलबाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत असताना आज चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत हरभऱ्याला सर्वात कमी दर मिळाला. चांदूर रेल्वे येथे हरभऱ्याला कमाल ५,४११ तर किमान ५००० तर नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत कमाल ५,२०० तर किमान ४,८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

धामणगावात कापूस ५,३०० रुपये : मागीलदोन तीन दिवसांपासून घसरलेले कापसाचे दर किरकोळ प्रमाणात सावरले असून, धामणगाव रेल्वे येथील खासगी बाजारात कापसाला कमाल ५,३०० रुपये तर अमरावती येथे ४,८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारात सध्या कापसाची अल्प आवक सुरू आहे.

देशातून मागणी वाढली
^देशाअंतर्गत असलेल्या विविध बाजारपेठेतून सध्या कडधान्यांची मोठी मागणी वाढलेली असल्यामुळे दुसरीकडे स्थानिक बाजारपेठेतही या धान्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ही भाववाढ एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल, याचा मात्र अंदाज नव्हता. शिवा पेढीवाल, खरेदीदार,परतवाडा.

विदेशातील उत्पादनातही घट
^ऑस्ट्रेलिया,म्यानमारआदी देशातही तूर हरभऱ्यांसह कडधान्यांचे उत्पादन कमी झाले आहे. याचा परिणाम देशातील बाजारपेठेवर होऊन दरवाढ झाली आहे. सतीशकुमार व्यास, संचालक,अचलपूर, कृउबा

धान्याची मागणी वाढली
^धान्यखरेदीवर शासनाने निर्बंध आणले असल्यामुळे खरेदीदारांनी हंगामात अल्प खरेदी केली होती. सध्या बाजारात मागणी वाढल्याने शेतमालाच्या दरात वाढ झाली आहे. अशोक मोहता, खरेदीदार,दर्यापूर.

बाजारसमिती तूर हरभरा गहू
अमरावती ९,९९९ ५,६५० १,९५०
अचलपूर ९,७०० ५,७०० १,८००
दर्यापूर १०,००० ६,००० ---
धामणगाव रे. ९,८०० ९,५०० १,६५०
चांदूर रेल्वे. १०,०११ ५,४११ ---
अंजनगाव सुर्जी. --- --- १,९००
नांदगाव खं. ९,८०० ५,२०० १,७००
बातम्या आणखी आहेत...