आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Laborer Died In Tiger Attack At Zarijamani

झरीजामणी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकुटबन - झरीजामणी तालुक्यातील घनदाट जंगलात मागील दोन वर्षांपासून मुक्तसंचार करणाऱ्या वाघाने डोंगरगाव (कोसारा) येथील राजेंद्र चांदोरे या ५२ वर्षीय शेतमजुरावर हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. याच वाघाने जानेवारी रोजी अडेगाव येथील दातारकर यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायीची शिकार केली होती. प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (कोसारा) येथील रहिवासी राजेंद्र चांदोरे हा शेतमजूर मंगळवारी सायंकाळी बदखल यांच्या शेतातून घराकडे परताना वाघाने पाठीमागून हल्ला केला.
रात्री उशिरापर्यंत घरी परतल्यामुळे राजेंद्रच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्यावेळी गावकऱ्यांना राजेंद्र चांदाेरे यांचा छिन्नविछिन्न मृतदेहच गावापासून दोन किमी अंतरावर जंगलात आढळला. वाघाने राजेंद्रचा एक पाय पार्श्वभागाचे लचके तोडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी. माहिती मिळताच सहा. वनपरिक्षेत्राधिकारी राजेश रत्नपारखी, सहा. वनसंरक्षक वणी, तहसीलदार ए. जी. देवकर, मुकुटबन पो.स्टे.चे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळेपर्यंत तसेच वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. मृतक राजेंद्र चांदोरेच्या पश्चात पत्नीसह एक मुलगा एक मुलगी अाहे. कुटुंबप्रमुखावरच काळाने घाला घातल्यामुळे चांदोरे कुटंुबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाचमाणसांसह जनावरांवर केले हल्ले : तालुक्यातीलसिंदीवाढोणा, पठारपूर, कोसारा, डोंगरगाव, अडेगाव, पवनार, मार्की, अडकोली, झरी, शिबला, दाभाडी, बोपापूर, खडकडोह, निमणी, येदलापूरसह जंगलालगत अनेक गायी, बैल, म्हशी, कालवडींची वाघाने शिकार केली आहे तर मागील दोन वर्षांत तालुक्यातील दाभाडी, बोपापूर, सिंदीवाढोणा, डोंगरगाव येथील माणसांवर हल्ला करून एका महिलेसह पाच जणांना ठार केल्याची घटना घडली आहे. नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याकरिता वन विभागाकडे मागणी केली आहे तसेच आंदोलनेसुद्वा केली, परंतु अद्याप वन विभागाने या वाघाला पकडले नाही.