आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणगाव तालुका कृषी कार्यालयात २१ पदे रिक्त, प्रभारींच्या खांद्यावर आहे कृषी कार्यालयाचा डोलारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - कृषी विकास दरामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने शासन विविध उपाययोजना करीत आहे. परंतु, ऐन खरिपाचा हंगाम तोंडावर असताना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मात्र रिक्त पदांचा दुष्काळ पडला आहे. एकूण ५० पदांपैकी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह एकूण २१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा अतिरिक्त प्रभार सांभाळताना प्रभारींची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या खरिपात कामे कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
येथील तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, अनुरेखक, वाहनचालक, शिपाई, चौकीदार अशा ५० पदांचा आकृ़तिबंध मंजूर आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. कृषी अधिकारी संवर्गाचे पद रिक्त आहे. कृषी मंडळ अधिकाऱ्याची दोन पदे रिक्त असल्याने मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाला कुणी वालीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय कृषी पर्यवेक्षकांच्या पाच पदांपैकी दोन पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांची २५ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी १८ पदे भरलेली आहेत, तर पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे अनेक कृषी सहायकांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे अनेक गावे अतिरिक्त असल्यामुळे काम करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कनिष्ठ लिपिकाचेही एक पद रिक्त आहे. अनुरेखकाची चार पदे मंजूर आहेत. परंतु, त्यांपैकी एकही पद अद्यापही भरलेले नाही, तर शिपाई चौकीदाराचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे.

तालुका कृषी कार्यालयात ५० पदांपैकी २१ पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचण्यास अडचणी येत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे योजनांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. जुलैपासून कृषी जागृती सप्ताह सुरू होणार आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. परंतु, तालुका कृषी अधिकारीच नसल्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक मार्गदर्शन मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा खेळ : येथीलतालुका कृषी अधिकारी दिलीप ठाकरे यांची सन २०१४ मध्ये चांदूर रेल्वे येथे बदली झाली. त्यानंतर मात्र येथील कार्यालयाला प्रत्येक वेळी प्रभारी अधिकारीच मिळाले. तेव्हापासून सत्यवान यांच्याकडेच या पदाचा प्रभार होता. ऑगस्ट २०१५ पासून अरुण भांबुरकर हे प्रभारी होते. या वर्षी मार्च महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत दिलीप ठाकरे यांच्याकडे प्रभार होता. खरड यांना मे महिन्यामध्ये प्रभारीचे आदेश प्राप्त झाले होते, तर आता नांदगाव खंडेश्वर येथील कृषी मंडळ अधिकारी अरुण गजभिये यांच्याकडे तालुका कृषी अधिकाऱ्याचा प्रभार सोपवण्यात आला आहे.

शेततळ्यांकडे पाठ : शेततळ्यांच्यामाध्यमातून शेतकऱ्यांना हक्काचा पाणीपुरवठा होतो. मात्र, मागेल त्याला शेततळे या योजनेकडे तुटपुंज्या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

अहवाल दिला
^येथील कृषी अधिकारी कार्यालयातील रिक्त असलेल्या पदांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. या वेळी योग्य तो निर्णय ते घेतील. अरुण गजभिये, प्रभारीतालुका कृषी अधिकारी.
रक्त पदांचा डोलारा सांभाळत उभे असलेले धामणगाव येथील तालुका कृषी कार्यालय.
बातम्या आणखी आहेत...